Drive Storage : गुगल ड्राईव्हचं स्टोरेज फुल झालंय? वापरून पाहा 'हे' फ्री क्लाउड स्टोरेज पर्याय

Google Drive Tips : गुगल ड्राइववर मोफत मिळणारा 15GB स्टोरेज स्पेस अनेकांसाठी पुरेसा नसतो.
Google Drive Hacks Secure Free StorageSpace
Google Drive Hacks Secure Free StorageSpaceesakal
Updated on

Tech Tips : आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात फोटो, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स स्टोअर करणे अगदीच सामान्य आहे. पण या सर्व फाईल्स ठेवायच्या कुठे? तर यावर सोईस्कर आणि सुरक्षित उत्तर म्हणजे गुगल ड्राइव! मोफत मिळणारा 15GB स्टोरेज स्पेस अनेकांसाठी पुरेसा नसतो. म्हणूनच आज आपण बघणार आहोत, आपल्या गुगल ड्राइवमध्ये जास्तीत जास्त फाईल्स स्टोअर करण्यासाठी काय करता येईल.

गुगल ड्राइव हे इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या कोणत्याही डिव्‍हाइसवरून तुम्ही ऍक्सेस करू शकता असे सुरक्षित स्टोरेज आहे. यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन्स, फोटो, व्हिडिओस असे विविध प्रकारचे फाईल्स अपलोड करून ठेवू शकता.

Google Drive Hacks Secure Free StorageSpace
Clean Gmail Storage : Gmailचं स्टोरेज झालंय फुल? मिनिटात होईल रिकामं,वापरून पाहा 'या' स्मार्ट ट्रिक्स

गुगल ड्राइवमध्ये काय ठेवता येतं?

महत्वाची कागदपत्रे जसे रिज्यूम, बॉन्ड आणि आर्थिक रेकॉर्ड सुरक्षितपणे ठेवा.

सहकाऱ्यांसह किंवा मित्रांसोबत रिअल टाइममध्ये डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन्स आणि स्प्रेडशीट्सवर शेयर करा.

तुमच्या फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप ठेवा जेणेकरून ते कोणत्याही डिव्‍हाइसवरून सहज उपलब्ध होतील.

Google Drive Hacks Secure Free StorageSpace
Gemini AI in Gmail :  ईमेलला उत्तर द्यायचंय! आता नो टेंशन; Gemini Gmail करणार सगळी मदत,वापरुन तर बघा

मोफत स्टोरेज वाढवण्याचे सोपे मार्ग

आपल्या गुगल ड्राइवची स्टोरेज स्पेस अधिकचे पैसे देऊन वाढवण्याचा मार्ग असला तरी, इतर मोफत पर्याय देखील उपलब्ध आहेत.

  1. OneDrive (मायक्रोसॉफ्ट वनड्राइव): मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍप्लिकेशन्ससोबत सहज कार्य करणारे वनड्राइव 5GB मोफत स्टोरेज देते.

  2. Mega (मेगा): मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेला मेगा तब्ब्ल 20GB मोफत स्टोरेज देतो.

  3. pCloud (पीक्लाउड): हा एक वेगळा पर्याय आहे. ते 10GB मोफत स्टोरेज देतात पण रेफरल आणि कामे पूर्ण करून अतिरिक्त स्टोरेज मिळवता येते.

जर तुमच्याकडे अनेक मोफत क्लाउड स्टोरेज अकाउंट्स असतील तर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी MultCloud नावाचा प्रोफेशनल मल्टीपल क्लाउड मॅनेजर वापरा. ते सध्या बाजारात असलेल्या 30 पेक्षा जास्त लोकप्रिय क्लाउड ड्राइव्सना सपोर्ट करतात. त्यामुळे तुमच्या अनेक गुगल ड्राइव अकाउंट्स हाताळण्यासाठीही MultCloud उपयुक्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()