स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय! या ट्रिक्‍सने सुटेल समस्या

स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय! या सिम्पल ट्रिक्‍सने त्वरित सुटेल तुमची समस्या
स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय!
स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय!Sakal
Updated on
Summary

वापरकर्त्याची मागणी लक्षात घेता, आजकाल बाजारात भरपूर स्टोअरेज स्पेससह स्मार्टफोनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पण...

वापरकर्त्याची मागणी लक्षात घेता, आजकाल बाजारात भरपूर स्टोअरेज स्पेससह स्मार्टफोनचे (Smartphone) अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पण जर तुमच्या डिव्हाइसची स्टोअरेज स्पेस 128 gb किंवा 64 gb पेक्षा कमी असेल, तर हेवी गेम किंवा फाइल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये 'Out of storage' दिसू लागतो. Android स्मार्टफोन्सची चांगली गोष्ट म्हणजे त्यांना बरेच कस्टमायजेशन ऑप्शन मिळतात. पण त्यांच्याबरोबर थोडी त्रासदायक गोष्ट म्हणजे, हळूहळू इंटर्नल मेमरी भरत राहाते. तुम्ही काही सोप्या मार्गांनी इंटर्नल स्टोअरेज मोकळे करून फोनची कार्यक्षमता सुधारू शकता.

स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय!
'iPhone 13'साठी आता दीर्घ प्रतीक्षा! 'यामुळे' घटली Apple ची उत्पादने

तुम्हाला स्मार्टफोनवर सर्व फाईल्स आणि ऍप्स ठेवणे आवश्‍यक असेल आणि तुम्हाला काहीही हटवायचे नाही; तरीही आपण काही सिम्पल क्‍लिनिंग टिप्ससह अतिरिक्त मेमरी मिळवू शकता.

आपल्या स्मार्टफोनमधील स्टोअरेज असे करा फ्री...

तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जा. स्टोअरेज निवडा. तुम्हाला फाइल कॅटेगरीची लिस्ट दिसेल आणि किती स्पेस शिल्लक आहे हे दिसेल. "फ्री अप स्पेस' ऑप्शनवर क्‍लिक करा. तुम्हाला "गूगल फाइल्स ऍप' किंवा "रिमूव्ह आयटम्स'ची सुविधा निवडण्याचा पर्याय मिळेल. रिमूव्ह आयटम सुविधा तुम्हाला तुम्ही बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ हटवण्याचा पर्याय देते. याशिवाय तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइल्स आणि कमी वापरलेले ऍप्स देखील काढून टाकू शकता.

Cache साफ करा

फोनची बहुतेक मेमरी Cache यामध्ये जाते, म्हणून सर्वप्रथम ती साफ करा. सेटिंग्जवर जा आणि स्टोअरेज वर जा. येथे तुम्हाला Cache दिसेल. ते साफ करा. हे तुमच्या कोणत्याही फायली हटवणार नाही. तसेच, स्मार्ट स्टोअरेज टॉगलद्वारे तुमच्या स्मार्टफोनचे स्टोअरेज मोकळे करण्याचा दुसरा पर्याय आहे. जेव्हा "स्मार्ट स्टोअरेज' टॉगल चालू केले जाते, तेव्हा डिव्हाइस 30, 60 किंवा 90 दिवसांनंतर बॅकअप घेतलेले फोटो ऍटोमॅटिक हटवते. स्टोअरेज भरलेले असताना देखील ते बॅकअप घेतलेल्या फायली हटवेल. तुमच्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येत नसलेले ऍप्स ठेवण्यामुळे स्टोअरेज फुल्ल होते.

स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय!
केवळ 69 हजार किमतीची स्टायलिश ऍम्पीयर मॅग्नस एक्‍स ई-स्कूटर लॉंच!

स्मार्टफोनमधून बिनवापराचे ऍप्स कसे काढायचे?

तुमच्या डिव्हाइसवर Play Store उघडा. आता वरच्या डाव्या कोपऱ्यातून मेनू उघडा आणि 'माय ऍप्स अँड गेम्स' वर जा. टॉप मेनू लाइनमधून 'इन्स्टॉल'वर टॅप करा. येथे वरच्या लाइनवर, उजवीकडे, "ऑन धीस डिव्हाइस' शोधा, जे आपल्याला लिस्ट फिल्टर करण्याचा पर्याय देते. येथे 'लास्ट युज्ड' निवडा. तुम्ही सर्वात जास्त वापरलेले ऍप्स वर दाखवले जातील. सूचीमध्ये खाली दिलेले ऍप्स गरजेनुसार काढले जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()