ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिनीनंतर आता पुन्हा चंद्रावर जाण्याच्या दिशेने लक्ष्य केंद्रित करत आहे. पण यावेळी मात्र इस्रोचे ध्येय अधिक महत्वाकांक्षी आहे ते म्हणजे चंद्रावर तीन भागांमध्ये उपग्रह पाठविण्याचा मान मिळवणे.
या महत्वाकांक्षी मोहिम पूर्तीसाठी इस्रो दोन महत्वाच्या अंतराळ वाहनांची निर्मिती करत आहे. पहिले म्हणजेच ‘सूर्या’ (Soorya) हे रॉकेट. सध्याच्या रॉकेटपेक्षा हे बरेच मोठे असून त्याची वहन क्षमता ४० टनांहून अधिक असेल. इतकी क्षमता अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. ‘सूर्या’ भारताचे अवकाश यात्री यान २०४० पर्यंत चंद्रावर पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करेल अशी आशा आहे,अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली.
दुसरे म्हणजेच पुनर्वापरयोग्य अंतराळ वाहन ‘पुष्पक’. हे यान अंतराळात जाऊन परत पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरेल. अशाच तंत्रज्ञानावर आधारित पुष्पकचे लहान स्वरुपाचे तीन यशस्वी प्रयोग आधीच पूर्ण झाले आहेत. आता यापेक्षा १.६ पट मोठे पुष्पक तयार केले जात आहे. या मोठ्या पुष्पकचीही चाचणी केली जाणार असून ते रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात पाठविण्यात येईल.
पुष्पक उपग्रह अवकाशात नेऊन परत आणण्यास सक्षम आहे. उपग्रह हा रॉकेटपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असतो. त्यामुळे पुष्पकसारखी पुनर्वापरयोग्य वाहने खर्चसापेक्ष असतात. जर एखादा उपग्रह अवकाशात स्थापित करायचा असेल तर SSLV, PSLV, LMV-3 or GSLV यासारखी रॉकेट्स वापरण्यात येतील. परंतु प्रयोग करण्यासाठी उपग्रह अवकाशात नेऊन परत आणण्यासाठी पुष्पकसारखी पुनर्वापरयोग्य वाहने अत्यंत उपयुक्त आहेत.
तिसरे म्हणजेच भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक. हे स्थानक २०२८ पर्यंत बनवण्याचे लक्ष्य आहे. या स्थानकाचे पहिले मॉड्यूल LVM3 (लॉन्च व्हेईकल मार्क-३) रॉकेटद्वारे अवकाशात पाठविण्यात येईल. या स्थानकाची सुरुवातीची रचना रोबोटिक कार्यासाठी करण्यात आली आहे. माणसासह अंतराळ मोहिनींसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे २०३५ पर्यंत हे स्थानक फक्त रोबोटिक कार्यासाठीच वापरण्यात येईल.
या महत्वाकांक्षी भारतीय अंतराळ मोहिम भारतीय शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमातून साकार होत आहे. या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळाच्या क्षेत्रात भारताचे नाव जगभरात अव्वल यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.