Mercedes-Benz: मर्सिडीजची ७५ लाखांची कार भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर ४२३KM धावणार; पाहा वैशिष्ट्ये

मर्सिडीज बेंझने आपली नवीन इलेक्ट्रिक कार EQB ला भारतात लाँच केले आहे. या कारमध्ये चालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक फीचर्स दिले आहेत.
Mercedes-Benz
Mercedes-BenzSakal
Updated on

Mercedes-Benz EQB Launched: मर्सिडीज-बेंझने आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही Mercedes-Benz EQB ला भारतात लाँच केले आहे. या एसयूव्हीची किंमत ७४.५ लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतात इलेक्ट्रिक लाइनअपचा विस्तार करत ३ इलेक्ट्रिक वाहनांना लाँच केले आहे.

मर्सिडीज बेंझ EQB ला वर्ष २०२१ मध्ये शांघाई ऑटो शो मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. आता ही नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच झाली आहे. याआधी मर्सिडीज बेंझने २०३० पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळेच कंपनी भारतासह इतर बाजारांमध्ये इलेक्ट्रिक कारला लाँच करत आहे.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

मर्सिडीज बेंझ ईक्यूबीबद्दल सांगायचे तर याची लांबी ४६८४mm, रुंदी, २०२०mm आणि उंची १,६६७mm आहे. याचा व्हीलबेस २८२९mm आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही स्लाइडिंग पॅनोरमिक सनरुफ, एमबीयूएख्स कंट्रोल सेंटर, वॉइस कमांड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग आणि इलेक्ट्रॉनिक टेलगेट ऑपरेशन्स सारख्या फीचर्ससह येते.

सुरक्षेच्या दृष्टीने देखील कारमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतात. यात ८ एअरबॅग्स, अ‍ॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अ‍ॅडाप्टिव्ह हायबीम असिस्ट आणि टीपीएमएम सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

Mercedes-Benz
Vivo Smartphone: स्वस्तात मस्त! अवघ्या ९ हजारात लाँच झाला शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

ईक्यूबी एक ७-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. यात पॉवरसाठी हाय-डेंसिटी लिथियम आयन बॅटरी पॅक आणि एसिंक्रोनस मोटरचा वापर करण्यात आला आहे. एसयूव्ही ६६.५ kW बॅटरी पॅकसह येते. हे २२८ बीएचपी पॉवर आणि ३९० एनएम टॉर्क जनरेट करते.

कार अवघ्या ८ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. गाडीला १० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त ३२ मिनिटं लागतात. कारचा टॉप-स्पीड ताशी १६० किमी आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर कार ४२३ किमी अंतर सहज पार करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.