Mercedes-benz Subscription Plan: लग्झरी कार कंपनी मर्सिडीजने वेगात गाडी चालवण्याची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहक ठराविक रक्कम देऊन कारचा स्पीड वाढवू शकतात. हा प्लॅन नक्की काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
काय आहे प्लॅन?
मर्सिडीज बेंजने गाडीचा स्पीड वाढवण्यासाठी खास प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहक आपल्या गाडीचा स्पीड अजून वाढवू शकतात. यासाठी ग्राहकांना ठराविक रक्कम कंपन्यांना द्यावी लागेल. यासाठी एकदाच वर्षाचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. या प्लॅनसाठी तुम्हाला १२०० अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास ९८ हजार रुपये वर्षाला खर्च करावे लागतील.
या कार्सवर मिळेल सुविधा
या प्लॅन अंतर्गत यूजर्स त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सचा स्पीड वाढवू शकतात. अमेरिकेत कंपनीच्या ईक्यू सीरिजच्या कारवर या प्लॅनचा फायदा मिळेल. मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक कार्समध्ये ट्यूनिंग केल्यानंतर आउटपूटला २० ते २४ टक्के वाढवू शकता. यासोबतच कारच्या टार्कला देखील वाढवू शकता. ज्यामुळे आधीच्या तुलनेत कारचा स्पीड वाढेल. कारच्या स्पीडमध्ये देखील ०.८ ते ०.९ सेकंदाचा फरक पडेल.
रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज ईक्यू ईक्यूई ३५० फॉरमॅटिकचा परफॉर्मेंस २१५ किलोवॉटवरून वाढून २६० किलोवॉट होईल. कारला ताशी शून्य ते ६० माइल्सचा वेग पकडण्यासाठी ६ सेकंदाऐवजी फक्त ५.१ सेकंद लागतील. ईक्यूई ३५० फोरमॅटिक व्यतिरिक्त ईक्यूई एसयूव्ही ३५० फोरमॅटिकचा वेग देखील वाढवता येईल. कार ६.२ सेकंदाऐवजी अवघ्या ५.२ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडेल.
ईक्यूएस ४५० फोरमॅटिक आणि ईक्यूएस एसयूव्ही ४५० फोरमॅटिकचा परफॉर्मेंस देखील २६५ वरून ३३० पर्यंत वाढेल. यामुळे कार ५.३ सेकंदाऐवजी अवघ्या ४.५ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडेल. यासाठी ईक्यूएस एसयूव्ही ४५० फोरमॅटिकला ५.८ सेकंदाऐवजी ४.९ सेकंद लागतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.