'मर्सिडीज-बेन्झ'वर ही वेळ का आली ? १० लाख गाड्या बाजारातून मागे घेणार

कंपनीचे म्हणणे आहे की, या गाड्यांच्या हाऊसिंग एरियात गंज चढल्याने ब्रेक लागण्यात अडचणी येत आहेत. यामुळे ब्रेकच्या पॅडेलवर जास्त जोर लावावा लागू शकतो आणि गाडी थांबण्याचे अंतर वाढेल.
mercedes benz
mercedes benzgoogle
Updated on

मुंबई : जेव्हा एखादी कंपनी आपले बाजारातील वाहनांचे उत्पादन मागे घेते तेव्हा त्यांचीय संख्या काही हजार ते काही लाखांच्या घरात असते. Mercedes Benz आता सर्व विक्रम मोडीत काढत १० लाख गाड्या बाजारातून परत घेत आहे.

mercedes benz
श्रेयस अय्यरचा सुपरसिक्सर, विकत घेतली करोडो रुपयांची मर्सिडीज; पहा फोटो

मर्सिडीज बेन्झने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार जगभरातून १० लाख गाड्या परत मागवल्या जाणार आहेत. यात ML, GL (BR 164) और R-Class (BR 251) या मालिकांतील कार्सचा समावेश आहे. या सर्व कार्स २००४ ते २०१५ या कालावधीत बनल्या आहेत.

mercedes benz
बॉस असावा तर असा! 22 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली मर्सिडीज

मर्सिडीजचे म्हणणे आहे की, या कार्समध्ये ब्रेकची समस्या जाणवू शकते. म्हणून त्या परत मागवल्या जात आहेत. यापैकी ७० हजार कार्स एकट्या जर्मनीत आहेत. म्हणूनच या कार्स परत मागवल्या जात आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, या गाड्यांच्या हाऊसिंग एरियात गंज चढल्याने ब्रेक लागण्यात अडचणी येत आहेत. यामुळे ब्रेकच्या पॅडेलवर जास्त जोर लावावा लागू शकतो आणि गाडी थांबण्याचे अंतर वाढेल.

mercedes benz
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात १२ करोड रुपयांची आलिशान मर्सिडीज कार

मर्सिडीजच्या गाड्या भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. लक्झरी प्रकारात याच गाड्यांची सर्वाधिक विक्री होते. नुकतीच कंपनीने C-Class लॉन्च केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com