Meta AI Update : मेटाचं महत्त्वाचं अपडेट! आता चटबॉटशी मातृभाषेत साधा संवाद, व्हॉट्सॲप अन् इंस्टावर देवनागरी भाषेचा समावेश

Meta AI Hindi Language Feature : मेटाच्या नव्या अपडेटमुळे हा चॅटबॉट आता व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे.
Meta AI Rolls Out Hindi Language Support and Advanced Image Tools
Meta AI Rolls Out Hindi Language Support and Advanced Image Toolsesakal
Updated on

Meta AI Editing Feature : मेटाने आपल्या AI चॅटबॉटला एका नव्या उंचीवर नेले आहे. हा चॅटबॉट आता अधिक बुद्धिमान, अधिक उपयोगी झाले असून जगभरात अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे.

मेटाच्या नव्या अपडेटमुळे हा चॅटबॉट आता व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे. याचा अर्थ आपण आपल्या मित्रांसोबत चॅट करताना किंवा पोस्ट वाचतानाच नाही तर या चॅटबॉटचा वापरही सहजपणे करू शकता.

या अपडेटची सर्वात मोठी बातमी म्हणजे या चॅटबॉटला आता हिंदी भाषेची साथ मिळाली आहे. आता तुम्ही तुमच्या हिंदीमध्ये या चॅटबॉटशी गप्पा मारू शकता. देवनागरी आणि रोमन लिपी दोन्हीमध्ये हिंदी उपलब्ध आहे.

याशिवाय, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या भाषांमध्येही चॅटबॉटची क्षमता वाढवण्यात आली आहे. मेटाच्या योजना भविष्यात आणखी भाषांचा समावेश करण्याच्या आहेत.

Meta AI Rolls Out Hindi Language Support and Advanced Image Tools
UPSC Update : UPSC मध्ये AI ची एन्ट्री! पूजा खेडकर प्रकरणातून घेतला धडा, परीक्षा प्रक्रियेत होणार मोठा बदल

हा चॅटबॉट आता फक्त चॅटिंगपुरता मर्यादित नाही. त्याच्यात फोटो एडिटिंग आणि जनरेशनचेही जबरदस्त फीचर आहे. 'इमेजिन मी' या नव्या फीचरमुळे आपण आपला फोटो अपलोड करून त्यावर आधारित वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो तयार करू शकता. जसे की, 'मला नृत्य करताना दाखवा' किंवा 'मला प्रार्थना करताना दाखवा'. हे फीचर सध्या अमेरिकेत चाचणी पातळीवर आहे.

पण इतकेच नाही. आपण तयार केलेल्या फोटोत बदलही करू शकता. आपल्याला काय हवे आहे ते शब्दात सांगा आणि चॅटबॉट आपला फोटो बदलून दाखवेल. जसे की, महाराष्ट्रियन जेवणाऐवजी पंजाबी जेवण द्या, कपड्यांचा रंग बदलून दाखवा, केसांची हेयरस्टाइल बदलून दाखवा आणि बरेच फीचर तुम्हाला वापरता येणार आहेत. लवकरच येणारा 'एडिट विथ एआय' बटण याला अधिक मजेशीर असणार आहे.

Meta AI Rolls Out Hindi Language Support and Advanced Image Tools
Whatsapp AI : मेटाने लाँच केलं भन्नाट AI फीचर; व्हॉट्सॲपमध्ये मिळणार पर्सनल फोटोग्राफर एडिटर अन् बरंच काही, काय आहे नवीन अपडेट?

मेटाच्या सर्व अॅप्सवर एकच जादू

या सर्व जबरदस्त गोष्टी आपण मेटाच्या सर्व अॅप्सवर वापरू शकता. म्हणजेच, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्ही ठिकाणी आपल्याला AI चॅटबॉटची जादू अनुभवता येईल.

ही सर्व अपडेट्स मेटाच्या AI चॅटबॉटला एक नवीन दिशा देणारी आहेत. आता आपण या चॅटबॉटचा वापर केवळ मजा करण्यासाठीच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.