Meta New App : ट्विटरला संपवण्याच्या तयारीत झुकरबर्ग ! मेटा आणतय नवीन अॅप

फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटा
Meta New App
Meta New Appesakal
Updated on

Meta New App : फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटा एका नवीन प्रॉडक्टवर काम करत आहे. या प्रॉडक्टबद्दल फार कमी जणांना माहिती आहे, परंतु हे नवे अॅप Twitter सारखे काहीतरी असू शकते. इलॉन मस्कच्या प्रवेशापासून लोकांच्या मनात ट्विटरबद्दल शंका आहेत आणि टेक कंपन्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे.

Meta New App
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

आता फेसबुकची मूळ कंपनी मेटा या गेममध्ये उतरली आहे. मेटा एक नवीन सोशल मीडिया अॅप तयार करत आहे ज्यावर लोक मजकूर-आधारित अद्यतने पोस्ट करण्यास सक्षम असतील. हे अॅप अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

Meta New App
Technology Tips : Alexa आणि Google Home तुमचं 'सिक्रेट' रेकॉर्ड करू शकतात, असा डिलिट करा डेटा

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, मेटा टेक्स्ट-आधारित सामग्री शेअर करण्यासाठी नवीन अॅपवर काम करत आहे. या अॅपला P92 कोडनेम देण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हे आगामी अॅप Instagram अंतर्गत ब्रँड केले जाईल . म्हणजेच, इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे युजरनेम आणि पासवर्डद्वारे रजिस्ट्रेशन करून हे अॅप वापरू शकतील.

Meta New App
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

मेटा नवीन मेटा अॅपवर काम करत आहे का ?

Meta ने स्वीकारले आहे की ते डिसेंट्रलाइज सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉलवर काम करत आहे. मेटा प्रवक्त्याच्या मते, कंपनी टेक्स्ट अपडेट शेयर करण्यासाठी डिसेंट्रलाइजसोशल नेटवर्क शोधत आहे. यासह, प्रोड्यूसर आणि पब्लिक फिगर व्यक्ती त्यांची आवड शेअर करू शकतात. सध्या तरी मेटा या नवीन अॅपच्या विकासाचे काम सुरू झाले आहे की नाही याबद्दल बोलत नाही आहे मात्र रिपोर्टनुसार, या अॅपवर काम सुरू आहे.

Meta New App
Physical Health : तुमच्या शरीरावरील पुरळ हस्तमैथुनामुळे आले आहेत का ? जाणून घ्या सत्य

मेटाचे नवीन अॅप ट्विटरशी स्पर्धा करेल

हे स्पष्ट आहे की इलॉन मस्कच्या आगमनानंतर, ट्विटर आपला युजरबेस टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत नवीन मेटा अॅप ट्विटरच्या अडचणी आणखी वाढवू शकते. त्याचबरोबर मेटालाही त्याचा लाभ मिळणार आहे. भारतात TikTok वर बंदी असताना, Instagram ने Reels फीचर लाँच केले होते. हे फीचर इंस्टा वर सर्वाधिक पसंत केले जात आहे.

Meta New App
Khandvi Recipe : तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत बेसन खांडवी कशी बनवाल?

P92 अॅपची वैशिष्ट्ये

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की P92 मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध असतील. यामध्ये क्लिक करण्यायोग्य लिंक्स, युजर प्रोफाईल, इमेज आणि व्हिडीओज आणि इतर यूजर्सना लाईक आणि फॉलो करण्याची सुविधा असेल. जरी त्याच्या पहिल्या एडिशनमध्ये, युजर्स इतरांच्या पोस्टवर कमेन्ट करू शकतील की नाही, हे सध्या माहित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.