Whatsapp AI : व्हॉट्सॲपमधली मेटा एआयची ब्ल्यू रिंग झाली गायब; आता कसं वापरणार AI?

Meta AI Blue Ring : गेल्या महिन्यापासूनच व्हाट्सॲप वापरकर्त्यांना आपल्या चॅटमध्ये एक निळी रिंग दिसून येत होती. ही निळी रिंग मेटा एआय चॅटबॉटला त्वरित प्रवेश देण्यासाठीचा एक शॉर्टकट होता.
WhatsApp's AI Shortcut Blue Ring Disappears
WhatsApp's AI Shortcut Blue Ring Disappearsesakal
Updated on

Meta AI Glitch : गेल्या महिन्यापासूनच व्हाट्सॲप वापरकर्त्यांना आपल्या चॅटमध्ये एक निळी रिंग दिसून येत होती. या निळ्या रिंगमुळे वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ही निळी रिंग मेटा एआय चॅटबॉटला त्वरित प्रवेश देण्यासाठीचा एक शॉर्टकट होता. पण आता मेटाने अचानक हा निळा रिंग काढून टाकली आहे.

काय आहे मेटा एआय?

मेटा एआय ही मेटाने विकसित केलेली एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चॅटबॉट आहे. या चॅटबॉटच्या साहाय्याने वापरकर्ते आपले प्रश्न विचारू शकतात, लेख, कविता किंवा गोष्टी लिहिण्यास सांगू शकतात, अगदी चित्रंही बनवू शकतात.

ही रिंग एकदम मजेदार आणि फायदेशीर होते. या रिंगचा वापर अनेक गोष्टींसाठी व्हायचा. मेटा एआयने आपल्यामध्ये देखील अनेक अपडेट्स आणले आणि भविष्यात हे अनेक अपडेट आणण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये इमेज मी या चॅटबोट अपडेटमध्ये तुम्ही व्हाट्सअपवरच तुमची प्रतिमा एआयच्या साहाय्याने बनवू शकता. त्याचबरोबर अन्य मेटा प्लॅटफॉर्मवर देखील हे एआय चॅट बॉट काम करत होते. पण ही निळी चॅट बॉट रिंग गायब झाल्याने वापरकर्ते देखील शॉक आहे.

WhatsApp's AI Shortcut Blue Ring Disappears
Meta AI Update : मेटाचं महत्त्वाचं अपडेट! आता चटबॉटशी मातृभाषेत साधा संवाद, व्हॉट्सॲप अन् इंस्टावर देवनागरी भाषेचा समावेश

का काढून टाकली निळी रिंग?

मेटाने अजूनपर्यंत याबाबत कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. पण तंत्रज्ञांच्या मते ही एक तांत्रिक चूक असावी. काही वापरकर्त्यांच्या फोनवर ही निळी रिंग अजूनही दिसत आहे, पण अनेकांच्या फोनवरून ती गायब झाली आहे.

मेटा एआयची स्पर्धा

मेटा एआयची स्पर्धा मायक्रोसॉफ्टच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनी एआयशी आहे. या सर्व कंपन्या आपल्या एआय चॅटबॉट्समध्ये दिवसेंदिवस नवे फीचर्स आणि सुधारणा करत आहेत.

हिंदीतही उपलब्ध

मेटा एआय आता हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. म्हणजेच आपण या चॅटबॉटला हिंदीत प्रश्न विचारू शकता आणि हिंदीतच उत्तरंही मिळवू शकता.

WhatsApp's AI Shortcut Blue Ring Disappears
Whatsapp AI : मेटाने लाँच केलं भन्नाट AI फीचर; व्हॉट्सॲपमध्ये मिळणार पर्सनल फोटोग्राफर एडिटर अन् बरंच काही, काय आहे नवीन अपडेट?

मेटा एआयमध्ये अजूनही बऱ्याच सुधारणा होणार आहेत. मेटाने या चॅटबॉटला अधिक स्मार्ट आणि अधिक उपयोगी बनवण्यासाठी काम सुरूच ठेवले आहे. भविष्यात पुढे मेटा एआयमध्ये काय नवे फीचर्स येतात हे पाहाण्यासारखे असेल.

WhatsApp वरील निळी शॉर्ट कट रिंग गायब झाली असला तरी, मेटा एआय हे एक अतिशय उपयोगी आणि मनोरंजक तंत्रज्ञान आहे. याचा वापर आपण तुम्ही कामांसाठी करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.