DeepFake : डीपफेकला आळा घालण्यासाठी मेटा आणणार नवीन नियम; कंपनीची मोठी घोषणा

रश्मिका मंदाना आणि कॅटरिना कैफ या अभिनेत्रींचे फेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
DeepFake Meta New Rule
DeepFake Meta New RuleeSakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून डीपफेकची भरपूर चर्चा सुरू आहे. रश्मिका मंदाना आणि कॅटरिना कैफ या अभिनेत्रींचे फेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर सरकारने देखील याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात मेटा कंपनीने देखील मोठा निर्णय घेतला आहे.

मेटा कंपनी डीपफेक एडिटेड फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याबाबत नवीन नियम लागू करणार आहे. यानुसार यूजरला मूळ फोटोमध्ये काय बदल केले आहेत याबाबत कंपनीला माहिती द्यावी लागणार आहे. नव्या वर्षात 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार असल्याचं मेटाने स्पष्ट केलं आहे.

DeepFake Meta New Rule
Explained : रश्मिकाच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आलं 'Deepfake', काय आहे ही टेक्नॉलॉजी ज्याची बायडेन यांनाही भीती?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नियम फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लागू होतील. डिजिटली एडिट केलेल्या फोटो किंवा व्हिडिओबाबत क्रिएटर्सना कंपनीकडे खुलासा द्यावा लागेल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने केलेलं वक्तव्य खरं आहे का, व्हिडिओ किंवा फोटोमध्ये दिसणारी घटना खरी आहे का, तसंच फोटो किंवा व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती खरी आहे की एआयने तयार केलेली आहे; अशी सर्व माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे. (Tech News)

एखाद्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये एखादी खरी घटना सांगितली असेल, तर सोबत जोडलेला फोटो खरा आहे की प्रतिकात्मक, किंवा सोबतचा व्हिडिओ खरा आहे की नाट्य रुपांतर याबाबत देखील कंपनीला सांगावं लागणार आहे. जर एखादा यूजर ही माहिती देत नसेल, आणि वारंवार माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

DeepFake Meta New Rule
Deepfake Video : 'डीपफेक'च्या धोक्यापासून असा करा स्वतःचा बचाव; कामी येतील 'या' टिप्स!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.