Meta on AI : ‘एआय’द्वारे निर्मित माहितीवर ‘मेटा’चे लक्ष; मतदानावर परिणाम करणारी माहिती काढून टाकणार

AI Generated Content : ‘फोटोरिॲलिस्टिक कंटेंट’ची कंपनीकडून बारकाईने पडताळणी करण्यात येणार असून लोकांना त्यांची माहिती देण्यात येईल.
Meta on AI
Meta on AIeSakal
Updated on

Meta strategy for Elections : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) देखील बोलबाला पाहायला मिळणार आहे. चुकीची माहिती आणि ‘एआय’चा वापर करून तयार करण्यात आलेल्या माहितीवर (कंटेंट) केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणेच ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या दोन बड्या प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या ‘मेटा’चे बारीक लक्ष राहील.

मतदानावर थेट परिणाम करणारा तसेच हिंसाचाराला चिथावणी देणारा मजकूर काढून टाकण्यात येणार आहे. यासाठी कंपनी तज्ज्ञांची मदत घेणार आहे. ‘मेटा’ भारताला केंद्रस्थानी ठेवून ‘स्पेसेफिक इलेक्शन्स ऑपरेशन्स सेंटर’ची निर्मिती करत असून त्यात संस्थेतील सर्व तज्ज्ञ काम करतील. गुगल, ओपनएआय, मायक्रोसॉफ्टवरील ‘एआय’चा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिमांवर ‘एआय जनरेटेड’ असा थेट शिक्का मारण्यात येईल.

मजकुराची तपासणी

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सवरील पोस्टवर कंपनीचे लक्ष असेल. ‘फोटोरिॲलिस्टिक कंटेंट’ची कंपनीकडून बारकाईने पडताळणी करण्यात येणार असून लोकांना त्यांची माहिती देण्यात येईल. ‘मेटाएआय’कडून तयार करण्यात आलेल्या प्रतिमांवर यूजरना सहज दिसेल असे वॉटरमार्क असेल.

Meta on AI
Meta Trademark Lawsuit : फेसबुकच्या पॅरंट कंपनीला वापरता येणार नाही 'मेटा' नाव, कोर्टाने दिले आदेश! मार्क झुकरबर्गला दणका

‘मेटा’चे सेफ्टी नेट

  • ४० हजार कर्मचारी - माहिती सुरक्षेसाठी

  • २० अब्ज डॉल - २०१६ पासून या तंत्रज्ञानातील गुंतवणूक

  • २० भारतीय भाषांवर कंपनीचे काम

  • १५ हजार - माहितीची पडताळणी करणारे कर्मचारी

  • जगभरातील ७० भाषांमध्ये काम सुरू

कंपनीचा यावर भर

  • चुकीच्या ऑनलाइन माहितीवर नजर

  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर टाळणे

  • यूजरमध्ये माहितीबाबत जागृती

  • व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होणाऱ्या

  • माहितीचे गांभीर्य पटवून देणे

Meta on AI
Mark Zuckerberg Katana : झुकरबर्गचं चाललंय काय? जपानी मास्टरकडून घेतले तलवार बनवण्याचे धडे; व्हिडिओ केला शेअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.