फेसबुकचा डेटा लीक झाल्याच्या बातम्या सतत आपल्या कानावर येतात आता देखील मेटाने फेसबुकच्या दहा लाखांहून अधिक वापरकर्त्यांच्या पासवर्डबाबत इशारा दिला आहे. फेसबुकच्या दहा लाखांहून अधिक वापरकर्त्यांच्या खात्याची माहिती पासवर्डसह लीक झाल्याचे मेटाने म्हटले आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरच्या थर्ड पार्टी अॅप्सद्वारे हा डेटा लीक झाला आहे.
मेटा म्हटले आहे की, गेल्या वर्षी अॅपलच्या अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर अशा 400 हून अधिक अॅप्सची ओळख पटली जी फेसबुक वापरकर्त्यांचे पासवर्ड आणि खात्याची माहिती चोरत होती. ज्या अॅप्सद्वारे फेसबुक वापरकर्त्यांच्या खात्याची माहिती चोरली गेली आहे त्यात फोटो एडिटर, कॅमेरा अॅप्स, व्हीपीएन सेवा, राशीफल अॅप्स आणि फिटनेस ट्रॅकिंग अॅप्सचा समावेश आहे.
हे अॅप्स युजर्सच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करत होते. त्यानंतर ते सर्व प्रकारचे एक्सेस घेत होते. त्यांचा उद्देश फेसबुक खात्यांमध्ये लॉग इन करून डेटा चोरणे हा होता, जरी डेव्हिड अॅग्रॅनोवीच, मेटा चे थ्रेट डिस्प्रप्शनचे संचालक म्हणतात की यापैकी बरेच काम करत नव्हते. डेव्हिड अॅग्रॅनोविच यांच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्स फेसबुक अकाऊंटद्वारे लॉगिन करायचे पण लॉगिन केल्यानंतर ते काम करत नव्हते.
अॅपलच्या अॅप स्टोअर आणि गुगल प्ले-स्टोअरवर अशी अॅप्स असली तरी अशा अँड्रॉइड अॅप्सची संख्या अधिक होती. बहुतेक डेटा चोरी अॅप्स फोटो फिल्टर अॅप्स होते. या सूचीमध्ये 47 iOS अॅप्स होते, बहुतेक बिझनेस युटीलीटी, व्हेरी बिझनेस मॅनेजर, मेटा बिझनेस, एफबी अॅनालिटिक आणि अॅड्स बिझनेस नॉलेज अशी या अॅप्सची नावे होती, ज्यामुळे लोक संभ्रमात पडत होते.
2019 मध्ये फेसबुकला फेडरल ट्रेड कमिशनने 2018 मध्ये कोट्यवधी फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा लीक केल्याप्रकरणी $ 5 बिलियन दंड ठोठावला होता. 2018 मध्ये केंब्रिज अॅनालिटिकाचं प्रकरण समोर आलं होतं. लंडनस्थित कंपनीकडे 2015 पासून फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा होता आणि तो अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत वापरला गेला. त्या वर्षी झुकेरबर्गवर पुन्हा एकदा खटला दाखल करण्यात आला.
आता काय करावे?
कोणत्याही प्रकारच्या डेटा लीकमध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर्व डिव्हाइसेसवरून तुमचे खाते लॉगआउट करा आणि पासवर्ड बदला. पासवर्डमध्ये नाव आणि मोबाईल नंबर व्यतिरिक्त ई-मेल आयडी वापरू नका असा सल्ला दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.