The Facebook Files : सोशल मीडिया सुधारलं नाही तर लाखो लोकांचा जाईल बळी; मेटाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर इशारा!

भारतात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी फेसबुकची भरपूर मदत झाली, असं हॉगन यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Meta whistleblower Frances Haugen
Meta whistleblower Frances Haugen eSakal
Updated on

मेटा व्हिसलब्लोअर फ्रान्सेस हॉगन यांनी सोशल मीडियाबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. सोशल मीडिया जर सुधारलं नाही, तर येत्या काळात लाखो लोकांचा बळी जाऊ शकतो. हॉगन यांनी काही काळ फेसबुकमध्ये काम केलं होतं. त्यानंतर २०२१ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी दि फेसबुक फाईल्स नावाचं डॉक्युमेंट लीक केलं होतं.

हा रिपोर्ट लीक केल्यामुळे त्यांना व्हिसलब्लोअर म्हटलं जातंय. या रिपोर्टमध्ये फेसबुकचा रिसर्च रिपोर्ट आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेली चर्चादेखील देण्यात आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.

Meta whistleblower Frances Haugen
AI for Elections : एआय ठरवणार भारताचा पुढचा पंतप्रधान? २०२४ च्या प्रचारात कसा होऊ शकतो वापर?

भारतात धार्मिक तेढ

फ्रान्सेस यांनी आपल्या रिपोर्टमध्ये बरीच गोपनीय माहिती दिली आहे. किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारा इन्स्टाग्रामचा काय परिणाम होतो याकडे मेटा अगदी कमी लक्ष देतं. तसेच, भारतात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी फेसबुकची भरपूर मदत झाली; असं हॉगन यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियाचा धोका

आता हॉगन यांनी जगाला एक गंभीर इशारा दिला आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे सोशल मीडिया हे अजूनही धोकादायक आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबद्दल बाहेर येणारी माहिती आणि सत्य माहिती यामध्ये भरपूर फरक आहे, यामुळेच मेटाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे असं त्या म्हणाल्या.

Meta whistleblower Frances Haugen
WhatsApp DP : आता व्हॉट्सअ‍ॅपचा प्रोफाईल फोटो बदलला तरी होऊ शकते कारवाई? खबरदारी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

सुधारणेची गरज

हॉगन म्हणतात, की सोशल मीडियाचा हा धोका कमी करण्यासाठी आपल्याला हा मीडिया समजून घ्यावा लागेल. सोशल मीडियामध्ये सुधारणा होणं अवघड आहे, मात्र त्याची आपल्याला गरज आहे. असं न झाल्यास पुढील २० वर्षांमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

म्यानमार नरसंहार

२०१८ साली संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या एका तपासात असं दिसून आलं, की म्यानमारमध्ये झालेल्या नरसंहारात फेसबुकचं भरपूर योगदान राहिलं. रॉयटर्सने याबाबत वृत्त प्रकाशित केलं होतं. तर, एका ब्रिटिश मुलाच्या आत्महत्येसाठी इन्स्टाग्रामला जबाबदार धरण्यात आल्यानंतर कंपनीने अनेक धोरणात्मक बदल केले होते.

Meta whistleblower Frances Haugen
US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()