Astronomical Events in November
Astronomical Events in NovembereSakal

Astronomical Events : उल्का वर्षाव, ग्रह-चंद्र युती अन् बरंच काही.. दिवाळीत खगोलीय घटनांची आतषबाजी!

यंदाच्या दिवाळीमध्ये आकाश निरीक्षकांसाठी विविध प्रकारच्या खगोलीय घटना आनंदात भर टाकणार आहेत.
Published on

गुलाबी थंडीसोबतच यंदाच्या दिवाळीमध्ये आकाश निरीक्षकांसाठी विविध प्रकारच्या खगोलीय घटना आनंदात भर टाकणार आहेत. यात प्रामुख्याने उल्का वर्षावाच्या निमित्ताने दिवाळी पूर्वी व दिवाळीनंतर उल्का वर्षाव, गुरू ग्रहाचे पृथ्वी सान्निध्य, ग्रह-चंद्र युती, ग्रह दर्शन, बुध ग्रह उदय, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकांच्या दर्शनाचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरताना त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी-जास्त होत असते. येत्या तीन नोव्हेंबरला सूर्यमालेत सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने या कालावधीत गुरू आकाशात आकाराने मोठा दिसेल. तसेच तो रात्रभर दर्शन देणार आहे. या वातावरणात सूर्य, पृथ्वी व गुरू ग्रह एका रेषेत येत आहे. सध्या या ग्रहाचे वास्तव्य मेष या राशीचक्रातील पहिल्या राशीत आहे. त्यामुळे मेष राशीतील हामाल, शेराटान व मेसार्टिम या तीन ताऱ्यांचा परिचय होईल, अशी माहिती विश्व-भारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

Astronomical Events in November
Jio Space Fiber : आता अंतराळातून इंटरनेट पुरवणार जिओ; 'स्पेस फायबर' टेक्नॉलॉजी सादर

ध्रुवतारा आणि ग्रह दर्शन

याच वेळी आकाश मध्याशी कुंभ राशीत शनी ग्रह आणि पहाटे पूर्वेस सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह, तसेच उत्तर आकाशात सप्तर्षी तारका समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांचे सरळ रेषेत ध्रुवतारा पाहता येईल. पाच नोव्हेंबरपासून पश्चिम आकाशात बुध ग्रहाचा उदय होत आहे.

दिवाळी पूर्व व पश्चात आकाशात उल्का वर्षाव

गुलाबी थंडीच्या दिवसांत दिवाळीच्या आधी ४, ५ आणि १३ नोव्हेंबर च्या रात्रीच्या प्रारंभी वृषभ राशी समुहातून दरताशी दहा या प्रमाणात तारे तुटताना पाहता येतील. दिवाळीनंतर १७ व १८ नोव्हेंबरच्या पहाटे पूर्वेस सिंह राशी समूहातून उल्कावर्षावांचा आनंद घेता येईल.

Astronomical Events in November
ISRO Moon Mission : आता चंद्राचे नमुने घेऊन येणार इस्रो; नव्या चांद्र मोहिमेवर काम सुरू - रिपोर्ट

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे दर्शन

  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे ८, १०, ११, १२ व १४ तारखेला दर्शन घेता येईल.

  • नऊ नोव्हेंबरला पश्चिमेस शक्र हा तेजस्वी ग्रह चंद्रासोबत युती तर काही ठिकाणी पिधान युती करेल.

  • १४ नोव्हेंबरला बुध ग्रह चंद्राजवळ युती स्वरूपात असेल.

  • शनी ग्रह २० नोव्हेंबरला, २५ तारखेला गुरू ग्रह चंद्राजवळ पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.