Meteor Shower : आकाशात चार दिवस दिवाळी; १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार उल्कावर्षाव

तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव असे म्हणतात.
Meteor Shower
Meteor ShowereSakal
Updated on

सिंह तारकासमूहातून १७ ते २० नोव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे तब्बल चार दिवस अवकाशात दिवाळी होणार आहे. अंधाऱ्या रात्री आकाशचे निरीक्षण करताना एखाद्या वेळी क्षणार्धात एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना आपणास दिसते. या घटनेस तारा तुटला असे म्हटले जाते.

खरे पाहता ही प्रकाश रेषा दुसऱ्या ताऱ्याची नसते. ती एक आकाशात घडणारी खगोलीय घटना आहे. तारा कधीही तुटत नसतो. या घटनेला उल्कावर्षाव असे म्हणतात. घराबाहेर पडलो आणि भराभर उल्का पडताना दिसल्या अशी अवास्तव कल्पना करून घेऊ नये. असे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.

उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी यांची खगोल जगतात खूप गरज आहे. धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष होय. या उल्का एखाद्या तारका समुहातून येत आहे असे वाटते.

Meteor Shower
Astronomical Events : उल्का वर्षाव, ग्रह-चंद्र युती अन् बरंच काही.. दिवाळीत खगोलीय घटनांची आतषबाजी!

तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव असे म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात तेव्हा त्यास ‘अशणी’असे म्हणतात. उल्काशास्त्रात अशणीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तूचे नमुने या अशणीमुळे आपणास मिळतात. त्यामुळे वस्तूच्या जडणघडणीचा अर्थ आपणास लावता येतो.

ज्यावेळी एखादी उल्का आपणास पडताना दिसते, या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा खूप आहे. परंतु अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह तारकासमूहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो.

Meteor Shower
Earth from Space Station : रात्रीच्या वेळी अंतराळ स्थानकातून कशी दिसते पृथ्वी? विहंगमय दृष्य दाखवणारा व्हिडिओ समोर

उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल. सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक गिरुळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.