MG ची पहिली पर्सनल AI असिस्टंट असलेली SUV Astor भारतात लॉंच

Astor
AstorSakal
Updated on

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज आगामी मिड साइज एसयूव्ही अ‍ॅस्टर (Astor) मध्ये देण्यात येत असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट (AI Assistant) आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल २ तंत्रज्ञानाचे अनावरण केले. एमजी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय (Artificial Intelligence) असिस्टंट मिळालेली Astor ही पहिलीच SUV कार आहे.

या कारमध्ये देण्यात आलेल पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म ‘स्टार डिझाइन’ने तयार केले आहे. यात मानवासारख्या भावना आणि आवाज काढले जातात. तसेच विकिपीडियाद्वारे प्रत्येक विषयावर तपशीलवार माहिती मिळते. हे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय-स्मार्ट हबची सुविधाही आहे. या प्लॅटफॉर्मवर CAAP च्या पार्टनरशिप, सेवा आणि सबक्रिप्शन देखील असेल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या सेवा पर्सनलाइज करता येतील

ऑटोनॉमस लेव्हल २ एमजी अ‍ॅस्टर मध्ये मिड रेंज रडार आणि मल्टी पर्पज कॅमेऱ्याची सुविधा देण्यात येत अल्याने, यात अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टिमच्या (ADSS) सिरीजचा अनुभव घेता येऊ शकतो. यात अ‍ॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी बँकिंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन, इंटेलिजंट हँडलँप कंट्रोल, रिअर ड्राइव्ह असिस्ट आणि स्पीड असिस्ट सिस्टीम आदींचा समावेश आहे. या सुविधांद्वारे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ शकते. भारतातील वाहतुकीच्या दृष्टीने ते अधिक अनुकूल करण्यात आले आहे.

Astor
होंडाची सर्वात स्वस्त कार Honda Amaze भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

भारतात प्रथमच एमजीने अनेक संधींसह CAAP चे सादरीकरण केले आहे. हे विविध इन-कार सेवांची सिस्टीम तयार करत सबक्रिप्शन्स आणि सेवांना होस्ट करते. यात मॅपमायइंडियासोबत नकाशे व नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोईनअर्थद्वारे ब्लॉकचेन संरक्षित वाहन , डिजिटल पासपोर्ट आणि इतर बऱ्याच सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. एमजीच्या कारमालकांना जिओ सावन अॅपवर म्युझिक ऐकता येईल आणि कारमध्ये हेट युनिटद्वारे पार्किंग स्लॉट बुक करण्याचे इंडस्ट्रीतील पहिले फीचर यामध्ये देण्यात आले आहे. या सर्व सोयींद्वारे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होईल.

Astor
वायरलेस हेडफोन्स तेही 600 रुपयांत, मिळेल बेस्ट साउंड क्वालिटी

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव छाबा म्हणाले, “ऑटो-टेक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच यशस्वी तंत्रज्ञान आधी सादर केले आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येही (AI) आम्ही पुढे जात आहोत. अ‍ॅस्टर ही एक पाऊल पुढे असून ग्राहकांना प्रीमियम/लक्झरी सेगमेंटमध्येच मिळणाऱ्या इंडस्ट्री फर्स्ट आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने एआयचा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()