MG Windsor EV Details : MG Motor आणि JSW यांची पहिली इलेक्ट्रिक कार 'Windsor EV' लवकरच भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. MG Motor ने त्यांची नवी कार लॉंच केली आहे. ही भारतातील पहिली 'इंटेलिजंट क्रॉसओवर युटिलिटी व्हेईकल' (CUV) असून तिची किंमत अंदाजे 25 लाख रुपये ते 30 लाख रुपये असणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 'Wuling Cloud EV' नावाने विकली जाणारी ही गाडी भारतात 4 व्हेरियंट्समध्ये म्हणजेच एक्झिक्युटिव, एक्साईट, एक्सक्लुझिव, आणि एसेन्समध्ये उपलब्ध होणार आहे.