Mia Khalifa Car Collection: मिया खलीफाकडे आहे कोट्यावधी रुपयांच्या कारचा ताफा, किंमत वाचून बसेल धक्का

मिया खलीफाकडे ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या लग्झरी कार्सचा भलामोठा ताफा आहे. या कार्सच्या किंमती कोट्यावधी रुपये आहे.
Mia Khalifa Car Collection
Mia Khalifa Car CollectionSakal
Updated on

Mia Khalifa's Luxurious Car Collection: एकेकाळी पोर्न चित्रपटात काम करणारी मिया खलीफा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. पोर्न चित्रपटात काम करणे बंद केले असले तरीही लोकांना तिच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यास नेहमीच रस असतो. मिया खलीफाकडे आलिशान कारचा देखील मोठा ताफा आहे. तिच्याकडे असलेल्या कारची किंमत वाचून तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. मिया खलीफाकडे असलेल्या या महागड्या कार कलेक्शनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

रिपोर्टनुसार, मिया खलीफाकडे Lexus ES आहे. भारतात या कारची किंमत जवळपास ५९,५०,००० रुपये ते ६५,६०,००० रुपये आहे. Lexus ES मध्ये २.५ लीटरचे ४ सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १६० kW पॉवर आणि २०२ NM टार्क जनरेट करते. कारचा टॉप स्पीड १३०mph आहे.

मिया खलीफाकडे BMW M4 कार देखील आहे. या लग्झरी कारची किंमत १३,३९०,००० रुपये आहे. कारमध्ये ३.० लीटर इनलाइन ६ सिलेंडर एम-पॉवर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ३७५kW आणि ६५० एनएम टार्क जनरेट करते. कारचा टॉप स्पीड २११mph आहे.

Mia Khalifa Car Collection
WhatsApp data breach: तुमची खासगी माहिती तर लीक झाली नाही ना? 'या' सोप्या स्टेप्सने घ्या जाणून

तिच्याकडे Jeep Wrangler कार देखील आहे. या कारची किंमत ५७.८५ लाख रुपये ते ६१.८५ लाख रुपये आहे. कारमध्ये २.० लीटर, ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २६८kW पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क जनरेट करते. ही एक ऑफ-रोडर कार असून, याचा टॉप स्पीड ताशी १८० किमी आहे.

मिया ४ कोटी रुपये किंमतीच्या Ferrari F12 Berlinetta ची देखील मालकीण आहे. ही सर्वात महागड्या कार्सपैकी एक आहे. कारमध्ये ६.२ लीटर, सुपरचार्ड व्ही१२ इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७३०.९bhp पॉवर आणि ६९०Nm टॉर्क जनरेट करतो. याचा टॉप स्पीड ३४०mph आहे.

मियाकडे २ कोटी रुपये किंमतीची Audi R8 Spyder कार देखील आहे. परंतु, या मॉडेलची विक्री भारतात होत नाही. यात ५.० लीटरचे व्ही१० पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, टॉप स्पीड ३३०kmph आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.