Micromax in OTT : शिक्षकाचा मुलगा मुकेश अंबानींना देणार टक्कर; OTT अन् AI क्षेत्रात एंट्री, एकेकाळी स्मार्टफोन मार्केटवर केलंय राज्य

Micromax Eyes Rivalry with Jio in OTT Space, AI Hardware Expansion : भारतीय स्मार्टफोन बाजारात एकेकाळी अग्रस्थानी असलेली मायक्रोमॅक्स कंपनी पुन्हा एकदा व्यवसायात मजबूत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
Micromax Eyes Rivalry with Jio in OTT Space, AI Hardware Expansion
Micromax Eyes Rivalry with Jio in OTT Space, AI Hardware Expansionesakal
Updated on

Micromax OTT latest Update : भारतीय स्मार्टफोन बाजारात एकेकाळी अग्रस्थानी असलेली मायक्रोमॅक्स कंपनी पुन्हा एकदा व्यवसायात मजबूत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. मायक्रोमॅक्सने एक दशकापूर्वी सॅमसंगला स्पर्धा देत काही काळ स्मार्टफोन मार्केटमध्ये वर्चस्व गाजवले होते. मात्र, नंतर कंपनी स्पर्धेत टिकू शकली नाही. आता मायक्रोमॅक्सने ओटीटी आणि एआय हार्डवेअर क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ओटीटी बाजारात मायक्रोमॅक्सची एन्ट्री

मायक्रोमॅक्स लवकरच एक नवीन कंटेंट अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे ज्यात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश असेल. कंपनीचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी मायक्रोमॅक्स चीन आणि इतर देशांतील कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. यामुळे, मुकेश अंबानी यांच्या जिओला मायक्रोमॅक्सकडून स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Micromax Eyes Rivalry with Jio in OTT Space, AI Hardware Expansion
Lebanon Pager Blast : तुमच्या स्मार्टफोनलाही बनवले जावू शकते पेजर स्फोटक; भारतालाही ब्लास्टचा धोका? एक्स्पर्ट म्हणतात...

एआय हार्डवेअर व्यवसायात प्रवेश

याशिवाय, मायक्रोमॅक्स एआय हार्डवेअर व्यवसायातही उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने विशेषतः एआय डेटा सेंटर्ससाठी कस्टम-मेड मेमरी आणि स्टोरेज सोल्यूशन्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासाठी मायक्रोमॅक्स तैवानमधील एका मोठ्या मेमरी चिप निर्माता कंपनीसोबत चर्चा करत आहे.

Micromax Eyes Rivalry with Jio in OTT Space, AI Hardware Expansion
Whatsapp Customize Feature : व्हॉट्सॲप चॅट्सचा लूक बदलण्यासाठी व्हा तयार; ॲपला बनवा कलरफुल, कसं वापराल हे खास पर्सनल फीचर?

उत्पादन सुविधांचे विस्तारीकरण

मायक्रोमॅक्सच्या उत्पादन विभागाने ग्रेटर नोएडातील विवोचे मोबाइल फोन कारखाना विकत घेतला आहे. या सुविधेत मोबाईल फोन, आयटी हार्डवेअर आणि ऑटोमोटिव्ह पार्ट्सचे उत्पादन केले जाईल. या उत्पादन प्रक्रियेत कंपनीने जगातील एका मोठ्या ओरिजिनल डिझाइन मॅन्युफॅक्चररसोबत संयुक्त उपक्रम करण्याचे नियोजन केले आहे, मात्र या भागीदाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.

मायक्रोमॅक्सच्या या नव्या योजनांमुळे भारतीय बाजारात मोठ्या बदलांची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.