Microsoft 365 Copilot : आता एक्सेल, वर्ड वापरणं होणार सोपं; मिळणार एआयचा सपोर्ट, मायक्रोसॉफ्टची घोषणा

या सेवेसाठी यूजर्सना सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागणार आहे.
Microsoft 365 Copilot
Microsoft 365 CopiloteSakal
Updated on

मायक्रोसॉफ्टने आपल्या यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. आपल्या टीम्स (Teams), एक्सेल (Excel) आणि वर्ड (Word) या प्लॅटफॉर्मवर आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयचा सपोर्ट मिळणार आहे. यासाठी यूजर्सना सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागणार आहे.

मायक्रोसॉफ्ट ३६५ कोपायलट (Microsoft 365 copilot) या नावाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे यूजर्सचा एक्सेल, वर्ड आणि टीम्स हे फीचर्स वापरताना एआयची मदत घेता येणार आहे. यूजर्सना येणाऱ्या ईमेलची रँकिंग, मीटिंग समरी, स्प्रेडशीट डेटाचे विश्लेषण, प्रेझेंटेशन डिझाईन अशा विविध गोष्टी करण्यासाठी एआयची मदत घेता येईल.

Microsoft 365 Copilot
Google Bard : गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध; मिळाले नवीन फीचर्स

जनरेटिव्ह एआय

बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टची ही सेवा जनरेटिव्ह एआय टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. मायक्रोसॉफ्ट ग्राफमध्ये कलेक्ट करण्यात आलेल्या यूजर्सच्या कमर्शिअल डेटाचा वापर करुन हे एआय स्वतःला ट्रेन करते. यामध्ये ईमेल, कॅलेंडर, चॅट आणि डॉक्युमेंट्समधील डेटाचा समावेश होतो.

या एआयसाठी आवश्यक डेटा गोळा करताना यूजर्सच्या सिक्युरिटी, प्रायव्हसी आणि कॉम्प्लायन्स पॉलिसीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतल्याचं मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं आहे. तसेच, एआयच्या लाँचनंतर देखील या पॉलिसी बदलणार नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

Microsoft 365 Copilot
Meta CM3leon : टेक्स्ट अन् इमेज जनरेशन आता होणार सोपं; मेटाने सादर केलं नवीन एआय टूल

सबस्क्रिप्शन

मिळालेल्या माहितीनुसार, ही एआय सुविधा वापरण्यासाठी यूजर्सना ३० डॉलर्सचं मासिक सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. रेकरिंग सबस्क्रिप्शनच्या मदतीने जादा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा या सेवेचा उद्देश असणार आहे. कोपायलट सेवा नेमकी कधी लाँच होणार याबाबत मात्र अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

इतर कंपन्यांना टक्कर

गुगल, आयबीएम अशा मोठ्या टेक कंपन्यांनी आधीपासूनच आपापले एआय टूल्स लाँच केले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये टेक्स्ट जनरेशन टूल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशातच आता मायक्रोसॉफ्टही या क्षेत्रात उतरत आहे. या सर्व दिग्गजांना टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने ओपन एआय सोबत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ओपन एआय ही चॅटजीपीटी हा प्रसिद्ध एआय टूल बनवणारी कंपनी आहे.

Microsoft 365 Copilot
AI for India 2.0 : आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण; मोदी सरकारने लाँच केली मोठी मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.