Microsoft Bing AI : मायक्रोसॉफ्ट बिंगमध्ये आलंय अ‍ॅडवांस्ड एआय; गुगलला टक्कर देणार!

Artificial Intelligence in Bing : मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्च इंजिन बिंगला कृत्रिम बुद्धिमत्तेचा दमदार टच दिला आहे. गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्यापेक्षा बिंगचे एआय फीचर हे वेगळे आहे.
Microsoft Bing Introduces AI-Powered Search Result
Microsoft Bing Introduces AI-Powered Search Resultesakal
Updated on

Bing AI Search Engine : मायक्रोसॉफ्ट विंडोज क्रॅशनंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी चर्चेत आली होती. जगभरातील विंडोज क्रॅश झाल्यानंतर सगळीकडे भयानक परिस्थिति होती. त्यावर माफीनामा सादर करत कंपनीने आपल्या नुकसान भरपाईच्या पॉलिसीचा खुलासा केला.

त्यामध्ये रिफंड बद्दलच्या अटी शर्ती सांगण्यात आल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच आता मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्च इंजिन बिंगला कृत्रिम बुद्धिमत्तेचा दमदार डोस दिला आहे. आतापर्यंत गुगलच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्च रिजल्ट सादर करत होते, पण आता बिंगही या स्पर्धेत उतरले आहे.

आता सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग विस्तारित होत आहे. अशात गुगलने पहिले पाऊल टाकत सर्च इंजिन लॉन्च केले. आता त्यानंतर मोठी प्रगती होताना दिसत होती. मायक्रोसॉफ्ट कंपनीने देखील बिंग या सर्च इंजिन वर या सर्च रिझल्टसाठी एआय लॉन्च केल्यामुळे आता वापरकर्त्यांना अधिक चांगल्या आणि सोयीस्करित्या मायक्रोसॉफ्ट वापरता येणार आहे. गुगल प्रमाणेच असणारे बिंग हे सर्च इंजिन आता अधिकच ऍडव्हान्स होणार आहे यात शंका नाही.

Microsoft Bing Introduces AI-Powered Search Result
Microsoft Crash Refund : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या भीषण आउटेजमुळे क्राउडस्ट्राइक वापरकर्त्यांना फटका! रिफंड मिळणार की नाही? काय आहे कंपनीची पॉलिसी

गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्यापेक्षा बिंगचे हे फीचर काही बाबतीत वेगळे आहे. गूगलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले उत्तर पहिल्यांदा येते आणि नंतर पारंपरिक सर्च रिजल्ट दिसतात. मात्र, बिंगमध्ये स्क्रीनच्या उजव्या बाजूला पारंपरिक सर्च रिजल्ट असतील आणि डाव्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले उत्तर आणि संबंधित माहिती दिले जाईल.

Microsoft Bing Introduces AI-Powered Search Result
CrimeGPT AI : पोलीस दलामध्ये दाखल झालाय एआय ऑफिसर; प्रश्न विचारणार अन् चुटकीसरशी गुन्हेगार ओळखणार

उदाहरणार्थ, तुम्ही 'आत्ताची राजकीय स्थिति काय आहे?' असे शोधले तर बिंग तुम्हाला या विषयावरील संपूर्ण माहिती, इतिहास, उदाहरणे आणि इतर तपशील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून देईल. यासोबतच या माहितीसाठी वापरलेल्या स्त्रोतांचीही लिंक दिले जातील.

हे नावीन्य सर्च इंजिनच्या जगात एक नवी दिशा दाखवणारी ठरू शकते. यामुळे वापरकर्त्यांना माहिती मिळणे अधिक सोपे आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.