Microsoft Cyber Attack : मायक्रोसॉफ्टवर सगळ्यात मोठा सायबर हल्ला; रशियाच्या 'मिडनाईट ब्लिझार्ड' ग्रुपवर संशय

मिडनाईट ब्लिझार्डला नोबेलियम, एपीटी29, कोझी बेअर अशा नावांनीही ओळखलं जातं. यापूर्वीही बऱ्याच सायबर हल्ल्यांमध्ये हे नाव समोर आलं आहे.
Microsoft Cyber Attack
Microsoft Cyber AttackeSakal
Updated on

Cyber Attack on Microsoft : जगातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टवरच सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये सायबर गुन्हेगार चक्क मॅनेजमेंटच्या ई-मेल अकाउंटपर्यंत पोहोचले असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. रशियातील सायबर ग्रुप मिडनाईट ब्लिझार्डने (midnight blizzard) हा हल्ला केला असल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टने केला आहे.

मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. मिडनाईट ब्लिझार्डला नोबेलियम, एपीटी29, कोझी बेअर अशा नावांनीही ओळखलं जातं. यापूर्वीही बऱ्याच सायबर हल्ल्यांमध्ये हे नाव समोर आलं आहे. हा ग्रुप रशियाची विदेशी गुप्तचर यंत्रणेशी जोडलेला असल्याचं सांगण्यात येतं. 2019 सालचा सोलरविंड्स हल्ला आणि 2015 साली झालेला डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी हल्ला देखील याच ग्रुपने केला होता.

नोव्हेंबरमध्ये झाला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यातच हा सायबर हल्ला झाला होता. मात्र, कंपनीच्या सायबर सिक्युरिटी टीमला 12 जानेवारी रोजी याची माहिती मिळाली. यानंतर तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की सीनियर मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी टीम, लीगल टीम आणि अन्य कर्मचाऱ्यांचा ईमेल देखील हॅक करण्यात आला होता.

Microsoft Cyber Attack
Microsoft AI Training : भारतातील एक लाख डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट देणार एआय प्रशिक्षण! 'ऑडेसी इनिशिएटिव्ह'ची घोषणा

या हॅकर्सनी ग्राहकांचा डेटा चोरला नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ते केवळ हे तपासत होते की मायक्रोसॉफ्टला त्यांच्या ग्रुपबद्दल किती माहिती आहे. यानंतर आता मायक्रोसॉफ्ट आपल्या सायबर सिक्युरिटीमध्ये बदल करणार आहे. याबाबत तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.