Microsoft Cyber Attack: मायक्रोसॉफ्टवर झालाय दहशतवादी हल्ला? कुणी केला? यापूर्वीही झालेत मोठे हल्ले! सायबर तज्ज्ञ काय म्हणाले?

Russian state-sponsored hackers: संगणकीय प्रणालींवर होणाऱ्या हल्ल्यांचे परिणाम आता हळूहळू जाहीर होत आहेत. सर्वत्र आपण संगणकीय प्रणाली वापरत आहोत. प्रणालीवर होणारे हल्ल्यामुळे याचे परिणाम भोगावे लागू शकतात हे आता हळूहळू जाहीर होत आहे, असे सायबर लॉ एक्सपर्ट महेंद्र लिमये म्हणाले.
Microsoft Cyber Attack news
Microsoft Cyber Attack newsEsakal
Updated on

भारत आणि अमेरिका सहित जगभरातील अनेक देशांमध्ये विमानसेवा ठप्प झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमध्ये अडचणी आल्यामुळे उड्डाण सेवा प्रभावित झाल्या आहेत. अनेक विमान कंपन्यांचे विमान उड्डाण करू शकले नाहीत. भारतात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू एअरपोर्टवर फ्लाइट्स ठरलेल्या वेळेच्या तुलनेत उशिरा चालत आहेत. भारत सरकारने या तांत्रिक अडचणींनंतर मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला आहे. अनेक देशांच्या सरकारांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

तांत्रिक अडचणींमुळे अनेक सेवा प्रभावित-

स्पाइसजेट, इंडिगो आणि अकासा एअरलाईन्स यांनीही याच प्रकारच्या तांत्रिक समस्यांचा उल्लेख केला आहे. इंडिगो आणि स्पाइसजेटसारख्या एअरलाईन्सचे म्हणणे आहे की सर्व्हरमध्ये अडचणींमुळे सेवा ठप्प झाल्या आहेत. एअरपोर्टवरील चेक-इन आणि चेक-आउट सिस्टम बंद पडले आहेत. बुकिंग सेवा देखील प्रभावित झाली आहे. फक्त विमान सेवाच नाही तर अनेक देशांमध्ये बँकिंग सेवा, तिकीट बुकिंग आणि स्टॉक एक्सचेंजवरही परिणाम झाला आहे.

सायबर तज्ज्ञ काय म्हणतात?

सायबर लॉ एक्सपर्ट महेंद्र लिमये यांनी म्हटले की, हा हल्ला आहे की काय याबद्दल ताबडतोब बोलणे अवघड आहे, परंतु मायक्रोसॉफ्टच्या इतिहासावरून हा दहशतवादी हल्लाच असावा असे वाटते. मायक्रोसॉफ्ट ही जगातील अग्रगण्य कंपनी आहे आणि त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये कमकुवतपणा आहे हे स्वीकारणे कठीण आहे.

मायक्रोसॉफ्टने यास सायबर हल्ला म्हटले आहे. बग बाऊन्टीमध्ये मायक्रोसॉफ्ट जगभरातील प्रमुख निर्माता आहे. प्रत्येक तंत्रज्ञानावर आंतरर्गत तपासणी केली जाते. आज हल्ला होत असताना रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे कदाचित हा हल्ला झाला असेल. विमानसेवा कंपन्या या तांत्रिक मुद्द्यांमुळे कुठून तरी भरपाई करण्याचा प्रयत्न करतील, पण सध्या तरी प्रवाशांच्या नुकसानीची भरपाई देणार नाहीत.

Microsoft Cyber Attack news
Microsoft Windows Crash: विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार ? भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, मायक्रोसॉफ्टने दिले स्पष्टीकरण

तांत्रिक अडचणींचा सर्वांगीण परिणाम-

या तांत्रिक अडचणींचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही होऊ शकतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या या हल्ल्यामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. खूप वर्षांपूर्वी झालेल्या वाय टू के हल्ल्यासारखाच हा हल्ला आहे. यापूर्वीही मोठ्या डिफेन्स प्रॉडक्ट निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर अशा पद्धतीचे हल्ले झाले आहेत, पण हे हल्ले तांत्रिक तपासणीमुळे फारसे उघड होत नाहीत.

भारतात वजीर एक्स क्रिप्टो करन्सी एक्सचेंजवर दोन दिवसांपूर्वी मोठा हल्ला झाला होता. जवळपास दीडशे मिलियन्सची क्रिप्टो करन्सी दुसऱ्या एक्सचेंजमध्ये स्थानांतरित करण्यात आली होती. संगणकीय प्रणालींवर होणाऱ्या हल्ल्यांचे परिणाम आता हळूहळू जाहीर होत आहेत. सर्वत्र आपण संगणकीय प्रणाली वापरत आहोत. प्रणालीवर होणारे हल्ल्यामुळे याचे परिणाम भोगावे लागू शकतात हे आता हळूहळू जाहीर होत आहे, असे सायबर लॉ एक्सपर्ट महेंद्र लिमये म्हणाले.

Microsoft Cyber Attack news
Microsoft Outage: क्राऊडस्ट्राइक कंपनी मायक्रोसॉफ्ट सर्व्हर क्रॅशला जबाबदार? काय आहे कंपनीचे काम? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.