Microsoft AI 'Bing' : मायक्रोसॉफ्टने आणले ‘एआय’वर आधारित ‘बिंग’

‘एज ब्राउजर’मुळे कंटेंट क्रिएशनला धार
microsoft rolls out chatgpt enabled new bing ai powered search engine
microsoft rolls out chatgpt enabled new bing ai powered search enginesakal
Updated on

न्यूयॉर्क : ‘चॅटजीपीटी’च्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मायक्रोसॉफ्टने यूजरसाठी ‘एआय’वर आधारित ‘बिंग’ हे नवे सर्च इंजिन आणि ‘एज’ ब्राउजर आणले आहे. सध्या बिंग डॉट कॉमवर याचा प्रिव्ह्यू उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामुळे यूजरसाठी सर्चिंग तर सुलभ होईलच पण त्याचबरोबर त्यांना परिपूर्ण उत्तरे आणि चॅटिंगचा नवा अनुभव घेता येणार आहे. याशिवाय त्याच्यात नव्याने कंटेंट तयार करण्याचे सामर्थ्य देखील आहे. ‘वेब’साठीचे हे ‘एआय’वर (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित हे कोपायलट असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

‘एआय’मुळे प्रत्येक श्रेणीतील सॉफ्टवेअर बदलेल. यामुळे सर्चिंगचे आयाम देखील बदलणार असल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सत्य नाडेला यांनी सांगितले. या नव्या ‘बिंग’ आणि ‘एज’च्या लॉंचिंगनंतर नेट विश्वामध्ये एकच खळबळ निर्माण झाली.

एकाच दिवसामध्ये दहा अब्जांपेक्षाही अधिक प्रश्न याबाबत विचारण्यात आल्याचे समजते. ‘बिंग’च्या आगमनामुळे यूजरना वेगळ्या सर्चिंगचा तर अनुभव घेता येईलच पण त्याचबरोबर त्यांना परिपूर्ण उत्तरे देखील मिळू शकतील. ‘एज’ ब्राउजरमध्ये देखील नव्या ‘एआय’वर आधारित क्षमता असून त्यात ‘चॅट’ आणि ‘कंपोज’ असा दुहेरी अनुभव घेता येईल.

उदाहरणच द्यायचे झाले तर मोठ्या वित्तीय अहवालाचे संक्षिप्त रूप त्या माध्यमातून मिळू शकेल. एखादा मजकूर तुम्हाला ‘लिंक्डईन’वर पोस्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ‘एज ब्राउजर’ची मदत घेता येईल. यूजर एखाद्या वेबपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्चिंगचा मूड देखील हे ब्राउजर जाणून घेऊ शकते. नव्या ‘बिंग’मध्ये पुढच्या पिढीतील ओपन एआय मॉडेल पाहायला मिळेल. कोअर सर्च अल्गोरिदमला हे ‘एआय’ लागू करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.