औरंगाबाद: Microsoft Windows 11 update: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आज अधिकृतपणे Windows 11 लाँचिंग केले आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 झाला. यादरम्यान कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 चे अनावरण केले. या नवीन सिस्टमबद्दल आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Windows 11 चालण्यासाठी तुमच्या पीसीमध्ये कोणते फिचर असणे गरजेचे (system requirements) आहेत?
- दोनपेक्षा जास्तचा कोर प्रोसेसर असणे गरजेचे आहे.
- क्लॉक स्पीड हा 1GHz किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे.
-RAM हा 4GB किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे.
-स्टोरेज कमीतकमी 64GB असावे.
- सुरक्षेसाठी पीसीमध्ये TPM security version (TPM 1.2) आणि SecureBootCapable support असणे गरजेचे आहे.
यामुळे इंटेलच्या सहाव्या आणि सातव्या जनरेशनचे प्रोसेसर असणाऱ्या मशीन्समध्ये नवीन अपडेट मिळू शकणार नाही. दरम्यान, एएमडी-आधारित सिस्टमवर (AMD-based systems), A-series and FX-series, रायझन 1000 आणि बहुतेक रायझन 2000 चीप Windows 11 चालवण्यास योग्य असणार नाहीत.
तसेच Windows 11 चालण्यासाठी कमीतकमी 9 इंचाचा डिस्प्ले 720p resolution सोबत असणे गरजेचे आहे. तसेच पीसी DirectX 12 graphics or WDDM2 सपोर्टिव असली पाहिजे. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये वरील फिचर्स नसतील तर तुमच्या लॅपटॉपला Windows 11 चे अपडेट येणार नाही आणि ते चालूही शकणार नाही. जर तुमच्याकडे desktop असेल तर त्यात बदल केल्यानंतर अपडेट मिळून जाईल
Windows 11 मध्ये नवीन काय?
- new user interface
- नवीन विंडो स्टोअर
- overhauled design language
- सेंट्रल अलाईन्ड टास्कबार आणि स्टार्ट बटन
- स्टार्ट अप मेन्यु पुर्वीपेक्षा वेगळा असून इथं आयकॉन्सही मिळतील
- रिकंमेंडेड सेक्शन
- रिसेट फाईल्ससाठी वेगवेगळे ऑप्शन्स असतील.
- फोन कनेक्टीव्हीटीत सुधारणा
- मल्टीटास्कींगसाठी नवीन फिचर्स
- स्नॅप लेआउट
- स्नॅप ग्रुप
- यामध्ये Microsoft Team चे इंटिग्रेशन दिलेले आहे.
- विजेट्स चे फिचर पर्सनलाइज करता येईल.
- किबोर्डचा टाळायचा असेल तर जेस्चर आणि स्टॅक फीचर अपडेट केले आहे.
- Windows 11 स्टोअरवर सिनेमेही उपलब्ध असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.