Microsoft Windows Crash: का झाले लॅपटॉप बंद? विंडोजचा Blue Screen Error म्हणजे काय ? कसं करावे दुरुस्त

What is Blue Screen Error: जगभरातील युजर्सच्या कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळं मोठी समस्या निर्माण झाली आहे.
Microsoft Windows Crash blue screen error
Microsoft Windows Crash blue screen error
Updated on

जगभरातील युजर्सच्या कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळं मोठी समस्या निर्माण झाली आहे. युजर्सला अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे. ब्यू स्क्रीन ऑफ डेथ समस्येचा सामना युजर्सला करावा लागत आहे. यासंदर्भात मायक्रोसॉफ्टने स्पष्टीकरण दिलं आहे.

(windows update issues causing blue screen error how to fix)

काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद होत आहेत आणि त्यानंतर यूजर्सना निळी स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर सांगण्यात येत आहे की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) म्हटले जात आहे.

Microsoft Windows Crash blue screen error
Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! बँकिंग-स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम; कोणत्या सेवा पडल्या ठप्प?

मायक्रोसॉफ्टने दिलं स्पष्टीकरण

CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CrowdStrike च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की, विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या उद्भवणाऱ्या एका व्यापक समस्या निर्माण झाली.

विंडोजचा Blue Screen Error म्हणजे काय?

ब्लू स्क्रिन एररला ब्लॅक स्क्रिन एरर किंवा स्टॉप कोड असे सुद्धा म्हणतात. जेव्हा विंडोजमध्ये मोठी समस्या निर्माण होते किंवा सिस्टम अचानक बंद होते किंवा रिस्टार्ट होते तेव्हा अशा प्रकारची समस्या उद्भवते. युजर्सचे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर निळ्या रंगाची स्क्रिन येते अन् 'Your PC ran into a problem and needs to restart. We're just collecting some error info, and then we'll restart for you.' असा मेसेज येतो.

म्हणजे, तुमच्या कम्प्युटरमध्ये समस्या उद्भवली आहे आणि रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. आम्ही काही त्रुटी, समस्येची माहिती गोळा करत आहोत आणि त्यानंतर तुमच्यासाठी रिस्टार्ट करु.

अशा परिस्थीतीत काय कराल? troubleshoot

  • जर आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये नवीन हार्डवेअर इंस्टॉल केले असेल आणि तुम्हाला ब्लू स्क्रिन एरर दिसला असल्यास सर्वप्रथम तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद करण्याचा प्रयत्न करा.

  • विंडोजमध्ये नवीन अपडेट्स इंस्टॉल करुन ठेवा.

  • जर तुमच्या सिस्टमवर सुद्धा ब्लू स्क्रिन एरर समस्या अजुनही येत असेल तर Get Help App वर जा आणि ब्लू स्क्रिन ट्रबलशूटरटी मदत घ्या.

  • सर्वातआधी Windows मध्ये Get Help App ओपन करा.

  • यानंतर सर्च बारमध्ये Troubleshoot BSOD error टाईप करा.

  • मग Get Help App वर देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.