मायक्रोवेव्हचा किती वापर करावा ?

मायक्रोवेव्ह उपकरण : जाणून घ्या फायदे तोटे
Microwave Use
Microwave Use
Updated on

सध्याच्या हायटेक युगात तंत्रज्ञानाने किचनमध्येही प्रवेश केला आहे. त्यामुळे आपण खात असलेले पदार्थ किती आरोग्यदायी आहेत याचा विचारही मनात येत नाही. केवळ झटपट तयार होते म्हणून आपण मायक्रोवेव्हसारखी उपकरणे वापरतो. पण त्याचा किती वापर केला पाहिजे हे तपासले पाहिजे. नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

फायदा काय?

मायक्रोवेव्हमध्ये अन्न लवकर गरम होतं आणि वेळही वाचतो. पण मायक्रोवेव्ह जास्त वेळ वापरल्यानेही नुकसान होते. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.त्याचा आरोग्यावर परिणाम होतो, असं आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

कर्करोगाचा धोका वाढतो

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील आवश्यक मिनरल्स फ्री रॅडिकल्समध्ये बदलतात ज्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये भाज्या गरम करणं टाळावं असा सल्ला दिला जातो. यामुळे इतर अनेक आजारांचा धोकाही टळतो.

अन्नातील पोषक घटक घटतात

असं मानलं जातं की मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील जीवनसत्त्वे आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच आरोग्य तज्ञ मायक्रोवेव्हचा वापर कमी करण्याची शिफारस करतात.

शरीरावर परिणाम काय ?

  • मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने रक्तातील सीरम पातळी आणि लिम्फ ग्रंथींवर वाईट परिणाम होतो.

  • हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे सुरळीत कार्य करण्यास मदत करते.

  • त्यांच्या प्रभावामुळे प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

  • मायक्रोवेव्हमध्ये जास्त वेळ अन्न गरम केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कारण असे बहुतेक अन्न हार्मोन्सची वाढ मंदावते.

डिहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नातील पाण्याच्या कणांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अन्न कोरडे होते.

शरीर डिहाइड्रेशनाचे बळी ठरू शकते. परिणामी आरोग्य तज्ज्ञ मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न टाळण्याचा सल्ला देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.