अंतराळात अनेकदा विचित्र घटना घडतात. या घटनांची भविष्यवाणी शास्त्रज्ञ करत असतात. त्यावरून भविष्यात काहीतरी विचित्र घडेल, अशी चर्चा लोकांमध्ये रंगलेली असते. त्यावरून अनेक तर्कही लढवले जातात. आता एक दुर्मिळ घटना घडणार आहे. पृथ्वीवरून आपल्याला दोन चंद्र दिसणार आहेत. शास्त्रज्ञांनी दुसरा चंद्र शोधला असून तो आपल्याला दिसणार आहे.
एक मिनी-चंद्र पृथ्वीभोवती सुमारे दोन महिने फिरेल. म्हणजे सप्टेंबर पासून नोव्हेंबरच्या अखेरीस हा चंद्र आपल्याला पाहता येणार आहे. याचा अर्थ पृथ्वीला दोन महिने दोन चंद्र असतील. ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची ताकद दर्शवते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. (Mini Mood)
हा मिनी चंद्र आकाशात दिसणाऱ्या चंद्रासारखा नसेल, तर तो लघुग्रहाच्या रूपात अत्यंत लहान असेल. या मिनी मूनचे नाव 2024 PT5 आहे.
हा चंद्र उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. हे पाहण्यासाठी हाय पॉवर टेलिस्कोप लागेल. हा मिनी-मून 2024 PT5 फक्त 10 मीटर (33 फूट) व्यासाचा आहे. शास्त्रज्ञांनी या वर्षी ऑगस्टमध्ये याचा शोध लावला. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होईल. या कालावधीत हा लघुग्रह पृथ्वीभोवती फिरेल, परंतु एकही परिक्रमा पूर्ण करू शकणार नाही.
मिनी-मून फारच क्वचित दिसतात. हे लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे 10 ते 20 वर्षांतून एकदाच पृथ्वीच्या कक्षेत येतात. हा छोटा मून देखील एक लघुग्रह आहे, जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ग्रहाच्या कक्षेत फिरेल. हा लहान आकाराचा असतो. त्यामुळेच आपण अनेकदा त्यांना दिसत नाही.
अशा लघुग्रहांना कक्षेच्या इतक्या जवळ जाणे देखील अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक वेळा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते वाट चुकतात किंवा जळून उध्वस्त होतात.
2024 PT5 नावाचा हा लघुग्रह किंवा लघु चंद्र स्पष्टपणे पाहण्यासाठी लोकांना प्रगत वेधशाळा वापरावी लागेल. X वर पोस्ट करताना, ग्रहांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ एरिकाने सांगितले की ते पृथ्वीपासून सुमारे 33 फूट व्यासाचे असल्याचे दिसून येईल.
29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत ते पृथ्वीभोवती फिरेल, परंतु तो कायमच असणार नाही. कारण दोन महिन्यांनंतर ते पुन्हा सूर्याभोवती फिरायला जाईल. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की 2024 PT5 पाहण्यासाठी खास उपकरणांचा आधार घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.
मिनी-मून दिसणे अगदी दुर्मिळ आहेत. पण अनेक अभ्यास आणि संशोधनातून असे दिसून आले आहे की पृथ्वीच्या कक्षेत असे अनेक लघुग्रह आढळले होते. 2022 NX1 नावाचा मिनी मून 1981 मध्ये पहिल्यांदा पाहण्यात आला. मात्र तो काही काळ गायब झाला.
त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा दिसला. आणि आता तो 2025 मध्ये दिसणार आहे. आणि पुढे तो 2051 मध्ये दिसणार असल्याचा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.