Smartphone Finger Pain : मोबाईलची सवय आणि त्याच्या दुष्परिणामांबाबत कायम बोललं जातं. घरातील एखादी व्यक्ती पोट दुखतंय म्हणाल्यावर "अजून वापर मोबाईल" असं विनोदाने म्हटलं जातं. मात्र काही दिवसांमध्ये ही गोष्ट केवळ विनोद राहणार नाही. कारण मोबाईलचा आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक बाबतीत दुष्परिणाम होत असल्याचं हळू-हळू समोर येत आहे.
आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होत आहेत. मोबाईलवर बोलणं किंवा टेक्स्ट करणं याव्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं अशा कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो, तरी सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी आपण हातात मोबाईल घेऊनच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
स्मार्टफोनचा आपल्या डोळ्यांवर, मानेवर, मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. मात्र सोबतच आपल्या हाताच्या बोटांवर देखील त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. विशेषतः अंगठा आणि करंगळी या बोटांवर आणि मनगटावर सर्वाधिक दुष्परिणाम होतो. अधिक काळ फोन पकडल्यामुळे जेव्हा तुमची बोटं दुखू लागतात, तेव्हा त्या कंडिशनला 'स्मार्टफोन फिंगर' असं म्हटलं जातं. (What is Smartphone Finger)
याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्मार्टफोनचं वजन आणि आकार आहे. पूर्वीच्या काळी मोबाईलचा आकार लहान होता. तसंच कित्येक बटणांचे फोन वजनाने देखील हलके होते. मात्र आता मोठ्या आकारांचे आणि अधिक वजनाचे स्मार्टफोन आले आहेत.
एकाच प्रकारे मोबाईल पकडून ठेवल्यानं बोटे आणि मनगटातील मांसपेशींवर ताण येतो. यामुळे याठिकाणी दुखू लागतं.
केवळ स्मार्टफोनच नाही, तर गेमिंग कन्सोल, टॅबलेट आणि वारंवार टायपिंग करून देखील अशा प्रकारचं दुखणं मागे लागू शकतं.
तुमचा हात दुखतोय असं वाटत असेल, तर त्वरीत आपला मोबाईल खाली ठेवा.
फोनचा वापर हळू-हळू कमी करण्याची सवय लावा.
एखाद्या कामासाठी फोन हातात घेतल्यास काम झाल्यानंतर लगेच खाली ठेवा.
बोटांना किंवा मनगटाला दुखत असल्यास त्या ठिकाणी बर्फ लावावा.
बोटांना शेकणे हादेखील चांगला पर्याय ठरू शकतो.
जर त्रास वाढत जातोय असं वाटलं, तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.