Useful Mobile Apps: डाऊनलोड करा हे APP आणि स्वतःला वाचवा वाहतुक नियमभंगापासून

digilocker app benefits: स्मार्टफोनमधील Smart Phone एका अॅपमुळे तुम्ही वाहतुकीचा दंड लागण्यापासून वाचू शकता. जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये हे अॅप App डाऊनलोड केलं तर ट्रॅफिक पोलिसांकडून दंड लागण्याची शक्यता कमी होईल
digilocker app benefits
digilocker app benefitsEsakal
Updated on

Simple Life Hacks: आपल्या प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. या स्मार्टफोनमधील विविध अॅपच्या मदतीने आपली अनेक कामं सुरळीत होवू लागली आहेत.

फोन बँकिंग अॅपमुळे बँकेत जाण्याचा वेळ वाचलाय. तसंच फोन बिलांपासून लाईट बिल भरणं, विविध गोष्टींच्या नोंदी ठेवणं अशी अनेक कामं यामुळे सोपी झाली आहेत. Mobile Apps Useful for uploading your Vehicle related document

पण तुम्हाला माहित आहे का या स्मार्टफोनमधील Smart Phone एका अॅपमुळे तुम्ही वाहतुकीचा दंड लागण्यापासून वाचू शकता. जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये हे अॅप App डाऊनलोड केलं तर ट्रॅफिक पोलिसांकडून दंड लागण्याची शक्यता कमी होईल. या अॅप्लिकेशनचं नाव आहे 'डिजी लॉकर'.

'डिजी लॉकर' हा एक Goverment programme आहे. याचा वापर विविध प्रकारची कागदपत्र सेव्ह करण्यासाठी होतो. या अॅपवर तुम्ही कोणत्याही प्रकारचे सरकारी कागदपत्र सेव्ह करू शकता. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट पासून तुम्ही यावर ड्रायव्हिंग लायसेंसदेखील सेव्ह करू शकता. 

कागदपत्र नसतील तरी काळजी नाही

डिजी लॉकरमध्ये DigiLoker तुम्ही वाहन चालक परवाना Driving License देखील सेव्ह करू शकता. डिजी लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांना ओरिजनल मानलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे हार्ड कॉपी म्हणजेच तुमच्याकडे ते कादगपत्र नसलं तरी चिंता नाही.

त्यामुळे जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरला असला आणि नेमकं तुम्हाला पोलिसांनी पकडलं तरी चिंता नाही. यावेळी तुम्ही डीजी लॉकरमधील तुमचा परवाना ट्राफिक पोलिसांना दाखवू शकता. हा परवाना ग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला दंड भरण्याची आवश्यकता पडणार नाही. 

हे देखिल वाचा-

digilocker app benefits
Mobile Export : मेक इन इंडिया; मोबाईल निर्यात ८५ हजार कोटींहून अधिक

कसे अपलोड कराल कागदपत्र

- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअऱवरून डिजी लॉकर अॅप डाऊनलोड करावं लागेल.

- त्यानंतर तुम्हा अॅपमध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारिख, आधार नंबर सर्व भरावी लागेल. 

- त्यानंतर तुमच्या फोनमध्ये एक OTP येईल. जो भरून तुम्हाला नंबर व्हेरिफाय करावा लागेल. त्यासोबतच तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल. त्यानंतर आधार नंबर वेरिफाय करावं लागेल. 

- तुम्ही आधार नंबर सबमिट केल्यानंतर पुन्हा एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर येईल. तो OTP वापरून आधार नंबर व्हेरिफाय करावा. 

- आता तुमचं डिजी लॉकर अॅप सुरू होईल. ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स सोबत इतरही महत्वाची कागदपत्र अपलोड करू शकता.

डिजी लॉकर या अॅपमुळे ट्रॅफिक पोलिसांनी रोखल्यावर गरजेची असणारी कागदपत्र दाखवणं शक्य होईल आणि चलान लागण्यापासून सुटका होईल.

अलिकडे वेग मर्यादा किंवा सिग्नल तोडणे अशा नियमांवर डोळा ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. रस्त्यावर कुठे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याची चालकाला कल्पना देखील नसते. अनेकदा नकळत काही नियम तोडले जातात. ट्रॅ

फिक पोलिसांनी पाहिलं नाही असा समज करून आपण सुटकेचा निश्वास टाकतो. मात्र आपण केलेला नियमभंग कॅमेरात कैद होतो आणि थेट तुम्हाला तुमच्या नंबरवर चलान पाठवलं जातं. तर तुम्हाला अशा चलान लागण्यापासून सुटका करण्यासाठी देखील काही अॅप आहेत.

ज्यामुळे तुम्हाला स्पीड कॅमेरा, डिव्हायडर आणि रेड लाईटची माहिती मिळू शकेल. जेणे करून तुम्हाला दंड भरण्याची वेळ येणार नाही. यासाठी तुम्हाला फोनमध्ये Waze किंवा Radarbot हे अॅप डाऊनलोड करावे लागतील. 

१. Waze अॅप

Waze हे एक ड्यूअल फंक्शन अॅप आहे. हे अॅप मॅपसोबतच स्पीड डिटेक्टर अशी दोन्ही कामं करतं. स्पीड कॅमेरा येण्याआधीच हे अॅप युजरला नोटिफिकेशन पाठवतं.

त्याचसोबत पुढे रोड बंद असेल किंवा हेवी ट्रॅफिक असेल तर त्याची माहिती देखील हे अॅप पुरवतं एंड्राइड आणि iOS दोन्ही युजर या अॅपला डाऊनलोड करू शकता. गुगुल प्ले स्टोअरवर १०० मिलियनहूीन अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं असून या अॅपला ४.१ इतकी रेटिंग आहे. 

२. Radarbot अॅप

हे अॅपदेखील एक ड्यूअल फंक्शन अॅप आहे. हे अॅप स्पीड कॅमेरा आणि नेविगेशन दोन्हीची माहिती उपलब्ध करून देतं. या अॅपच्या मदतीनेही युजरला स्पीड डिटेक्टर कॅमेरा, रोड ब्लॉक आणि लाइव्ह ट्राफिकबद्दलची माहिती मिळू शकते.

तसचं हे अॅप स्पीड लिमिटची माहिती देत. या अॅपला ५० मिलिनयहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलंय. तर या अॅपला 4.3 इतकं रेटिंग आहे. 

या अॅप्सच्या मदतीने तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर दंड लागण्याची चिंता राहणार नाही. शिवाय तुम्हाला वेळोवेळी तुमच्या रुटबद्दलची माहिती देखील मिळेल आणि प्रवास करणं सोप होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.