Mobile Data Security : मोबाईल दुरुस्तीला देण्यापूर्वी 'हे' काम करा; अन्यथा खासगी डेटा गेलाच म्हणून समजा..

Mobile Security : आपल्या डेटाचा चुकीचा वापर होणार नाही, यासाठी आपण स्वतःच काही काळजी घेणं गरजेचं आहे.
Mobile Data Security
Mobile Data SecurityeSakal
Updated on

Mobile Security Tips : आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक झाला आहे. आपल्या फोनमध्ये आपले खासगी फोटो, बँकिंग डीटेल्स, सेव्ह केलेले पासवर्ड आणि बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळेच आपला मोबाईल चुकीच्या हातांमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

आपला स्मार्टफोन आपण सहसा कोणाकडे देत नाही. मात्र, काही खराबी आल्यास दुरुस्त करण्यासाठी तो रिपेअरिंगच्या दुकानात द्यावाच लागतो. अशा वेळी काही तासांसाठी आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीच्या हातात द्यावा लागतो. त्याचा चुकीचा वापर होणार नाही, यासाठी आपण स्वतःच काही काळजी घेणं गरजेचं आहे.

डेटा करा डिलीट

सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देण्यापूर्वी त्यातील खासगी डेटा काढून टाकणं गरजेचं आहे. हा डेटा तुम्ही एखाद्या पेनड्राईव्हमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेऊ शकता.

Mobile Data Security
Personal Data : मेटा, लिंक्डइन, गुगल... तुमचा पर्सनल डेटा शेअर करतायत या कंपन्यांचे अ‍ॅप्स! हादरवणारी आकडेवारी समोर

बँकिंग अ‍ॅप्सबाबत खबरदारी

आपल्या फोनमध्ये असणारे बँकिंग आणि यूपीआय पेमेंट अ‍ॅप्स शक्यतो डिलीट करा. हे तुम्ही मोबाईल मिळाल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल करु शकता. यासाठी आधीच आपले पासवर्ड आणि इतर क्रेडेन्शिअल्स एखाद्या सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा. (Tech News)

अ‍ॅप लॉकचा वापर करा

कित्येक अ‍ॅप्स यूजर्सच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त लॉकचा पर्याय उपलब्ध करून देतात. व्हॉट्सअ‍ॅप तसंच काही पेमेंट अ‍ॅप्समध्ये एक्स्ट्रा सिक्युरिटी लेअर देण्यात आली आहे. हे फीचर सुरू केल्यास अ‍ॅप उघडण्यासाठी तुमच्या मोबाईल पासवर्ड व्यतिरिक्त दुसऱ्या पासवर्डची गरज भासते. यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

Mobile Data Security
WhatsApp Chat Lock : आता विशिष्ट चॅटला लावता येणार सीक्रेट कोड; व्हॉट्सअ‍ॅप आणतंय खास सेफ्टी फीचर

फोटो गॅलरी आणि गुगल अ‍ॅप्स

तुमची फोटो गॅलरी आणि गुगलच्या काही अ‍ॅप्सना देखील अतिरिक्त लॉक लावणं फायद्याचं आहे. गुगल फोटोजमध्ये आपल्या फोनमधील फोटो आणि व्हिडिओ बॅकअप होत असतात, तसंच आपल्या जीमेल अकाउंटवर कित्येक पासवर्ड सेव्ह असतात. ओटीपी किंवा पासवर्ड रिसेट करण्यासाठी देखील बहुतांश वेळा जीमेलवरच कोड पाठवला जातो. त्यामुळे जीमेल अकाउंटला एक्स्ट्रा लॉक लावणं अधिक गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.