'या' योजनांसाठी KYC अपडेट करा असा Message येतोय? मग, सावधान! फसव्या लिंकला वयस्कर लोक पडताहेत बळी

Cyber ​​Crime : जिल्ह्यातही गेल्या सप्टेंबर महिन्यात ११ जण या फसवणुकीला बळी पडले आहेत, यात वयस्कर लोकांचे प्रमाण अधिक आहे.
Mobile Hackers Cyber ​​Crime
Mobile Hackers Cyber ​​Crimeesakal
Updated on
Summary

मोबाईलवर येणारा लाभाचा मजकूर किंवा चित्र (थंबनेल) याला अनेकजण भाळले जातात. सोशल मीडिया हा सायबर गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे.

सांगली : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (ladki Bahin Yojana) आणि ‘पीएम किसान’ (PM Kisan Yojana) यासारख्या लोकप्रिय योजनांचा सध्या बोलबाला आहे. मोबाईल हॅकर्सनी (Mobile Hackers) म्हणजेच सायबर गुन्हेगारांनी (Cyber ​​Crime) हीच बाब हेरुन लोकांची आर्थिक फसवणूक सुरू केली आहे. या प्रकारच्या फसव्या लिंक रोज मोबाईलवर धडकत आहेत. सध्या एपीके (ॲन्ड्रॉईड पॅकेज कीट) फाईल्स सध्या ट्रेंडिंगला असून, राज्यात धुमाकुळ घातला आहे.

जिल्ह्यातही गेल्या सप्टेंबर महिन्यात ११ जण या फसवणुकीला बळी पडले आहेत, यात वयस्कर लोकांचे प्रमाण अधिक आहे. मोबाईलवर येणारा लाभाचा मजकूर किंवा चित्र (थंबनेल) याला अनेकजण भाळले जातात. सोशल मीडिया हा सायबर गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे. लाडकी बहीण, पीएम किसान योजनांसाठी केवायसी अपडेट करा, याप्रकारचे मेसेज सायबर गुन्हेगारांकडून सोशल मीडियात प्रसारित केले जातात. सध्या एपीके फाईलचा वापर करून लोकांना फसवले जात आहे.

Mobile Hackers Cyber ​​Crime
सहा एड्स रुग्णांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्र्यांचा 'हनीट्रॅप'; समोर आली स्फोटक माहिती, भाजप आमदारच मुख्य सूत्रधार

ही लिंक ओपन केल्यास एपीके फाईल डाऊनलोड होते. व्हायरसच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार मोबाईलचा ताबा घेतो. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून पेमेंट ॲपचा सहज वापर केला जातो. गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या क्ल्‍युप्तीने सामान्यांची बँक खाती मोकळी होत आहेत. मोबाईलचा ताबा मिळाल्यानंतर इतर मोबाईवर अश्लील फोटो टाकून नंतर पैशांची मागणी केली जाते.

आर्थिक फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगाराने क्रेडिट कार्ड वापरून काही खरेदी केली, तर ते पैसे परत मिळण्याचे प्रमाण चांगले आहे. कारण, तक्रारदाराला योग्यरितीने पाठपुरावा करायला वेळ मिळतो. जानेवारी २०२४ पासून आजतागायत आर्थिक फसवणुकीतील ३ लाख ७० हजार रुपये सांगली सायबर पोलिसांनी परत मिळवले आहेत. मात्र, इतर प्रकारे फसवणूक झाल्यास तक्रारदाराला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

केंद्र सरकारच्या cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ११ तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सायबर पोलिसांकडून दिली. सोशल मीडियावर येणाऱ्या अनोळखी लिंक ओपन करू नका, असा सल्ला सायबर पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Mobile Hackers Cyber ​​Crime
Ratan Tata : कुपवाडला Nano Car चं सूतोवाच; रतन टाटांचा तीन वेळा सांगली दौरा अन् 2008 मध्ये 'नॅनो' आली बाजारात

अशी घ्या काळजी

फसवणूक झाल्यास तत्काळमध्ये १९३० या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन बँक खाती गोठवून घेता येतील. केंद्र सरकारच्या cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल. तसेच बँकेत जाऊन केवायसीद्वारे आपल्या बंद सीमकार्डचे मोबाईल नंबर काढून टाकावेत.

या लिंकद्वारे फसवणूक

बेटिंग, ॲप डाऊनलोड, रिवॉर्ड, लॉटरी, कुरिअर पेमेंट, लाईट बिल, जाहिरात, पार्सल डिलिव्हरी, मोबाईल रिचार्ज, एटीएम एक्स्पायरी, बिनव्याजी कर्ज आदी प्रकारच्या फसव्या लिंकमधून फसवणूक केली जात आहे.

Mobile Hackers Cyber ​​Crime
दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

लिंक सुरक्षितरीत्या ओपन करायची असेल, तर त्या लिंकवर क्लिक न करता ती कॉपी करून गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’ ब्राऊजर वर पेस्ट करावी. ती लिंक तिथे ओपन केल्यास मोबाईल हॅक होण्याची शक्यता कमी असते. लॉगिन डिटेल्स यासह इतर माहिती हॅकरला माहिती चोरणे शक्य होत नाही. लिंकद्वारे कोणतेही ॲप डाऊनलोड झाल्यास ते उघडू नका. लिंकवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

-दिनेश कुडचे, संगणक अभियंता, सांगली

अशी घ्या दक्षता...

  • लिंकमध्ये शॉर्ट युआरएल वापरुन खरा युआरएल लपवला जातो.

  • शॉर्ट युआरएल असेल, तर ती लिंकदेखील धोकादायक असू शकते.

  • लिंकच्या थंबनेल किंवा मजकुरावरून त्यातील फोलपणा ओळखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.