Mobile Internet: मोबाइल हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. आपली विविध कामे आपण मोबाइलवर करतो. इंटरनेटचा वापर करतो. पण, जर हेच इंटरनेट कनेक्शन अचानक बंद पडत असेल, स्लो होत असेल तर नक्कीच ते आपल्याला त्रासदायक वाटेल. परंतु, अगदी सोप्या ट्रिक्स वापरून मोबाइल इंटरनेटची गती वाढवता येऊ शकते.
तुमच्या फोनवर सिग्नल चांगला आहे याची खात्री करा. सिग्नल कमजोर असेल तर जास्तीत जास्त सिग्नल मिळणाऱ्या ठिकाणी जा.
काही वेळा फक्त फोन बंद करून पुन्हा चालू केल्याने इंटरनेटच्या समस्या दूर होतात.
एअरप्लेन मोडवर फोन ठेवल्यावर आणि परत बंद केल्याने मोबाइल नेटवर्कशी पुन्हा कनेक्शन रिसेट होते.
तुमचा ब्राउजर किंवा जे कोणते अॅप हळू चालत आहे त्यांचा कॅशे साफ करा.
बॅकग्राउंडमध्ये खूप सारे अॅप्स चालू असल्याने तुमचे इंटरनेट हळू होऊ शकते.
तुमच्या सर्व अॅप्स आणि फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट असल्याची खात्री करा. अपडेट्समुळे बग फिक्स होऊन परफॉर्मन्स सुधारतो.
तुमच्या डेटा पॅकची मर्यादा ओलांडली नाही ना ते तपासा. मर्यादा ओलांडल्यास इंटरनेटची गती कमी होऊ शकते.
जर तुमच्या इंटरनेटच्या गतीची समस्या जास्त सतावत असेल तर नेटवर्क सेटिंग्ज रिसेट करून बघा. पण, लक्षात ठेवा, असे केल्याने तुमची वाय-फाय पासवर्ड आणि ब्लूटूथ पेअरिंग डिलीट होतील.
जर तुम्ही थ्रीजी वापरत असाल तर फोरजी किंवा फाइव्हजी (उपलब्ध असल्यास) वर स्विच करा. पर्यायाने, वाय-फाय कनेक्शनवर स्विच करणेही चांगले.
या टिप्स वापरूनही समस्या सुटत नसेल तर तुमच्या नेटवर्क देणाऱ्या कंपनीशी संपर्क साधावा. ते तुमची समस्या सोडवण्यासाठी मदत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.