Mobile Hacks: अनेक लोक फोनमधील स्टोरेज फुल झाल्यावर फोटो किंवा अॅप्स डिलिट करतात. तसेच अनेक फाईल्स देखील डिलिट करतो. पण असे न करता फोनमधील स्टोरेज वाढवण्यासाठी पुढील काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. यामुळे तुम्हाला फाईल्स, फोटो किंवा अॅप डिलिट करावे लागणार नाही.
तुम्हाला हे फीचर अँड्रॉइड फोनमध्ये सहज मिळेल. जर तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल झाले असेल तर सर्वात आधी या फीचरने तुमच्या मोबाईल फोनमध्ये स्पेस बनवणे सुरू करा.
फोनमध्ये स्पेस बनवण्यासाठी उपयुक्त नसलेले किंवा वापरात नसलेले ॲप्स डिलिट करू शकता. तुमच्या फोनमध्ये बाय डिफॉल्ट येणारे अॅप्स काढून टाकू शकता.
जर तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज बाय डीफॉल्ट कमी असेल, तर वेगवेगळे ई-कॉमर्स ॲप्स डाउनलोड करण्याऐवजी तुम्ही वेब पोर्टलवरून त्यांच्या सेवा घेऊ शकता. यामुळे फोनचा बराचसा स्टोरेज वापरता येईल.
तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनसाठी ऑटो-डाउनलोड सिलेक्ट केले असेल तर आजच बंद करा. कारण यामुळे तुमच्या फोनचे स्टोरेज फुल होते. ऑटो-डाउनलोड बंद केल्यास फोटो किंवा फाईल्स डाऊनलोड होणार नाही.
मेल आणि स्पॅम फोल्डर वेळोवेळी क्लिअर केले पाहिजे. जेव्हाही एखादे नवीन ॲप डाऊनलोड करतो तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक ईमेल्स येऊ लागतात. अशावेळी फोनच्या स्टोरेजवर परिणाम होतो आणि फोन हँग होऊ लागतो.
अशा प्रकारे, वरील पद्धतींनी तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज सहज वाढवू शकता. या स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला कोणतेही ॲप डिलिट करावे लागणार नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.