How to prevent sim swapping: सध्या अनेक महत्वाच्या कामांसाठी तुमचा मोबाईल नंबर हा अत्यंत महत्वाचा आहे. बँक खात्यासाठी तसचं सोशल मीडिया आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी Online Transaction मोबाईल नंबरचा वापर केला जातो. अनेक महत्वाच्या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. Mobile Usage tips in Marathi beware of sim card swapping scam
मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीच्या OTP मदतीने आधार कार्ड, बँक खातं आणि ईमेल व्हेरिफाय केला जातो.
मोबाईलनंबरसाठी वापरात येणारं सिमकार्ड Sim Card हे जरी तुमच्या मोबाईलमध्ये असलं तरी तुमचा नंबर एखादी इतर व्यक्ती देखील वापरू शकते.
सिम कार्ड स्वॅपिंग Sim Card Swapping आणि क्लोनिंगच्या मदतीने एखादी इतर व्यक्ती तुमच्या सिम कार्डला अॅक्सेस मिळवू शकते. या सिम कार्ड स्कॅममुळे तुमची खासगी माहिती इतर व्यक्ती मिळवू शकते. एवढचं नव्हे तर तुमच्या बँक खात्यातील पैसे देखील काढू शकते.
सिम कार्डच्या या स्कॅमसंदर्भात जागरुक होण्यासाठी आजवर अनेक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सिम स्वॅपिंगमुळे बँक खातं धोक्यात
सिम स्वॅपिंग स्कॅममुळे तुमचं बँक खातं धोक्यात येऊ शकतं. तुमचं सिम कार्ड क्लोन करून किंवा स्वॅपिंगच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढली जाऊ शकते. या स्कॅममध्ये स्कॅमर्स सुरुवातीला तुमची सर्व माहिती मिळवतात. तुमचा मोबाईल क्रमांक, पत्ता, संपूर्ण नाव अशी माहिती मिळवली जाते.
या माहितीच्या आधारे गुन्हेगार सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून दुसरं सिम कार्ड मिळवतात. सिम चोरी झाल्याचं किंवा हरवल्याचं कारण देत स्कॅमर्स सिमकार्ड ब्लाॅक करण्यास सांगून दुसरं सिम कार्ड जारी करण्याची रिक्वेस्ट करतात.
हे देखिल वाचा-
नवं सिम कार्ड इश्यू झाल्यानंतर तुमचं सिम कार्ड ब्लाॅक होतं. यालाच सिम स्वॅपिंग म्हणतात.
तर दुसरीकडे इतर व्यक्ती तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने ओटीपी मिळवून तुमच्या खात्यातील पैसे काढून घेऊ शकतात. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्कॅम होताना दिसत आहे. यातीलच एक सिम स्वॅपिंग स्कॅम सध्या चिंता वाढवणारा आहे. कारण यामध्ये तुमचा नंबर कुणी इतर वापरत असल्याचं तुमच्या लक्षातही येत नाही.
सिम स्वॅपिंग स्कॅमपासून वाचण्यासाठी ही घ्या काळजी
जर तुम्हाला सिम स्वॅपिंग स्कॅमपासून दूर राहायचं असेल तर तुमची खासगी माहिती इतरांना मिळणार नाही याची काळजी घ्या. यासाठी सर्वप्रथम कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाईल देऊ नका.
तुमची खासगी माहिती किंवा महत्वाचे दस्तावेज सोशल मीडियावर शेअर करू नका. एवढंच नव्हे तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कागदपत्रं शेअर करू नका.
तुमचं सिम कार्ड डिअॅक्टिव्ह किंवा अचानक ब्लाॅक झाल्याचं लक्षात येताच तुमच्या इंटरनेट बँकिंगसह इतर महत्वाचे पासवर्ड बदला.
तसंच क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील ब्लॉक करा.
तसचं cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.