Chandrayaan 4 Budget : अवकाश मोहिमांना मोदी सरकारने दिले बळ; चांद्रयान-४ अन् ‘गगनयान’सह शुक्राच्या अभ्यासासाठी किती कोटींचं बजेट मंजूर?

PM Modi Cabinet Meeting : ‘चांद्रयान-४’ व ‘गगनयान’सह शुक्राच्या अभ्यासासाठीही मंजुरी दिली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत दोन हजार १०४ कोटींच्या चांद्रयान- ४ मोहिमेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली
study of Venus with 'Chandrayaan-4' and 'Gaganyaan' Approved in Cabinet Meeting
study of Venus with 'Chandrayaan-4' and 'Gaganyaan' Approved in Cabinet Meetingesakal
Updated on

Modi Government Cabinet Meeting : भारतीय खगोलशास्त्रज्ञांना केंद्र सरकारने आज भक्कम पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत दोन हजार १०४ कोटींच्या चांद्रयान- ४ मोहिमेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरविणे तसेच त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा या मोहिमेत समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर चंद्रावर मानवी मोहीम आखण्यात आली आहे. ‘चांद्रयान-४’ मोहिमेचा आणखी विस्तार करताना नव्या पैलूंची भर घालण्यात आली आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सज्जतेला आज मंजुरी देण्यात आली.

चंद्रावर यान उतरविणे ही मोठी कामगिरी ठरली होती. आता चंद्रावर यान उतरविणे, तेथील नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर यान परत आणणे यावर या मोहिमेत भर देण्यात आला. ही मोहीम ३६ महिन्यांत पूर्ण करायाची आहे.

study of Venus with 'Chandrayaan-4' and 'Gaganyaan' Approved in Cabinet Meeting
Chandrayaan 4 Budget : मोदी सरकारचा मोठा निर्णय; चांद्रयान-४ साठी 2104 कोटींचं बजेट,शुक्र ऑर्बिटर मिशनही असणार एकदम खास

गगनयान मोहीम

देशाच्या पहिल्या अवकाश स्थानकाच्या विकासाचा समावेश असलेल्या गगनयान मोहिमेच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. आठ मोहिमांचा समावेश असलेला सुधारित गगनयान कार्यक्रम डिसेंबर २०२९ मध्ये हाती घेण्यात येईल. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल’च्या मोहिमेचा प्रस्ताव मान्य केला आहे.

‘एनपीके’ खतांसाठी तरतूद

२०२४-२५ च्या रब्बी मोसमात शेतकऱ्यांना ‘एनपीके’ खते अंशदानित दरात उपलब्ध करून देण्यासाठी २४ हजारांहून अधिक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतमालाच्या दरांतील चढउताराला आळा घालून स्थिर दरांद्वारे शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी ‘पीएम-आशा’ अन्नदाता संरक्षण अभियानांतर्गत ३५ हजार कोटींची तरतूद असलेल्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

study of Venus with 'Chandrayaan-4' and 'Gaganyaan' Approved in Cabinet Meeting
Sunita Williams Update: स्टारलायनर यान अंतराळवीरांना न घेताच पृथ्वीवर परतले; मग सुनीता विल्यम्स अंतराळात कुठे अन् कश्या राहतायत?

मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय

५४९ जिल्ह्यांतील ६३ हजार ६४७ आदिवासीबहुल गावांमधील पाच कोटी आदिवासींच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान प्रस्ताव, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इमर्सिव्ह क्रिएटर्सच्या स्थापनेचा प्रस्ताव व जैवनिर्मिती आणि जैव फौंड्रीच्या गुंतवणूक या प्रस्तावांना मंजुरी मिळाली.

शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी मोहीम

पृथ्वीचा जुळा ग्रह मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाभोवती घिरट्या घालणे, त्याच्या पृष्ठभागाचा आणि अंतरंगाचा, ग्रहाच्या वातावरणावरील सूर्याच्या प्रभावाचा तसेच एकेकाळी पृथ्वीप्रमाणे राहण्यास योग्य असण्याचा अंदाज असलेल्या या ग्रहामध्ये काळाच्या ओघात कसे परिवर्तन घडले याचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०२८ मध्ये मोहीम राबविली जाणार आहे. यासाठीच्या आर्थिक तरतुदीला आज मंजुरी देण्यात आली.

study of Venus with 'Chandrayaan-4' and 'Gaganyaan' Approved in Cabinet Meeting
Sunita Williams Update : सुनीता विल्यम्सनी तोडले सगळे रेकॉर्ड; जगभरातून होतंय कौतुक,नेमकं कारण काय?

खर्चाला मंजुरी (कोटी रुपयांमध्ये)

चांद्रयान-४ २,१०४

गगनयान २०,१९३

एनजीएलव्ही ८,२३९

एनपीके खते २४,४७५

शुक्र ग्रह अभ्यास १,२३६

आदिवासी विकास ७९,१५६

जैव फौंड्री गुंतवणूक ९,१९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.