DND म्हणजे काय? जाणून घ्या मोबाईल युजर्संच्या डोकेदुखीचा Activate आणि Deactivate फॉर्म्युला

Modi Govt, penalties company for sending sms  dnd registered customers, Mobile Users You Know DND, DND Activate, DND Deactivate procedure,DND, Do Not Disturb
Modi Govt, penalties company for sending sms dnd registered customers, Mobile Users You Know DND, DND Activate, DND Deactivate procedure,DND, Do Not Disturb
Updated on

डिजिटल इंडियाची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने DND संदर्भात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. सरकारने घेतलेला निर्णयाने मोबाईल युजर्संना 'अच्छे दिन' येणार नसले तरी अनावश्यक मेसेजच्या माऱ्यापासून युजर्संना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या मोबाईल युजर्संनी Do Not Disturb (DND) सेवा अ‍ॅक्टिव्ह केली आहे अशा ग्राहकांना SMS आणि कॉल केल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा मोठा निर्णय केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतला आहे. 

डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत  केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार ग्राहकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जाणून घेऊयात DND म्हणजे नेमकं काय? आणि ही सेवा  अ‍ॅक्टिव्ह किंवा डिअ‍ॅक्टिव्ह कशी करायची.

सध्याच्या घडीला मोबाईल वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांना अनावश्यक मेसेज आणि कॉलमुळे विनाकरण त्रासाचा सामना करावा लागतो. स्मार्टफोन असो किंवा साधा फोन या दोन्ही युजर्संला असा अनुभव येत असतो. मोबाईल युजर्संचा त्रास कमी करण्यासाठी जी सेवा लागू करण्यात आली त्याला DND म्हणजे  Do Not Disturb (डू नॉट डिस्टर्ब) सेवा देण्यात येते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ने ही सेवा सुरु केली असून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी याचा स्विकार केला आहे.   

जेव्हा तुम्ही DND सेवा सुरु करता तेव्हा तुम्हाला कमर्शियल मेसेज आणि कॉल येणे बंद होते. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्सं या सेवेचा लाभ घेऊ शकतात. आता या DND मध्येही दोन प्रकार असतात.  

आंशिक म्हणजे काही निवडक मेसेज टाळणे (Partial DND)

पूर्णत: सर्व प्रकारचे कमर्शियल मेसेज टाळणे (Full DND)

 

निवडक DND प्रकारात तुम्हाला कोणत्या प्रकारचे मेसेज टाळायचे यासंबंधीचा निर्णय घेणे शक्य होते. उदा. Banking, Marketing, Financial, Educational, Entertainment आदी. यापैकी पर्याय निवडून तुम्ही जे मेसेज किंवा कॉल नको आहेत त्याची निवड करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध असतो. दुसरीकडे पूर्णत: डीएनडी सेवा घेतली तर कोणत्याही प्रकारचा प्रमोशनल मेसेज तुम्हाला येत नाही. 

DND Activate करण्याची प्रक्रिया काय?
कोणत्याही कंपनीचे मोबाईल कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरु किंवा बंद करण्यासाठी वेगेवगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. कस्टमर केअरला कॉल करुन तुम्ही सेवा सुरु किंवा बंद करु शकता. याशिवाय मोईलवरुन संदेश पाठवून किंवा आयव्हीआर  (इंटरएक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स) च्या माध्यमातून ही सेवा सुरु किंवा बंद करु शकता.

SMS च्या माध्यमातून DND Activate करण्याची प्रक्रिया 

  • Message बॉक्समध्ये new message वर क्लिक करा 
  • मेसेज बॉक्समध्ये ‘STOP 0‘ टाईप करुन हा मेसेज 1909 या क्रमांकावर पाठवा 
  • सात दिवसांत सेवा सुरु होईल आणि त्रासदायक मेसेजमधून तुमची सुटका होईल. 
  • जर तुम्हाला काही निवडक मेसेज किंवा कॉल पासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही आंशिक DND सेवेचा लाभ घेऊ शकता. 

ही सेवा सुरु करण्यासाठी START नंतर  0 च्या ऐवजी तुम्हाला जी सेवा बंद करायची आहे तो क्रमांक टाकावा लागेल एक ते सात दरम्यान संख्या निवडून तुम्ही ठराविक प्रकारचे मेसेज रोखू शकता. 

START 1 बँकिंग, विमा आणि फायनान्स संबंधीत येणारे मेसेज किंवा कॉल बंद होतात. 

  • START 2 या वर्गात रियल इस्टेट सेवेतील मेसेज तुम्ही टाळू शकता. 
  • START 3 मध्ये Education आणि Study Promotional
  •  START 4  मध्ये Health
  • START 5  मध्ये Automobile
  •  START 6  कम्युनिकेशन आणि मनोरंजन 
  • START 7  ट्रॅव्हलिंग संदर्भातील मेसेजचा समावेश होते.  

DND सेवा Deactivate कशी करायची
ही सेवा सुरु केल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेवा बंद करायची असेल तर  1909 वर STOP असा मेसेज लिहून तुम्ही सेवा बंद करु शकता. DND  Activate करणे म्हणजे अनावश्यक मेसेज बंद करणे आणि DND Deactivate करणे म्हणजे अनावश्यक मेसेज बंद केल्यानंतर पुन्हा ते मेसेज सुरु करण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()