स्वस्तात मस्त! Molife Sense 320 स्मार्टवॉच भारतात लॉंच

Molife Sense 320
Molife Sense 320Google
Updated on

Molife कंपनीने एक नवीन स्मार्टवॉच Sense 320 भारतात लाँच केली आहे. ही स्मार्टवॉच नवीन डिझाइन आणि काही दमदार फीचर्ससह भारतीय बाजारात दाखला झाली आहे. या कंपनीची देशात लॉंच करण्यात आलेली ही दुसरी स्मार्टवॉच असून या स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स आणि SPO2 आणि हार्ट रेट सेन्सर देखील देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर ही स्मार्टवॉचमध्ये तब्बल 15 दिवस चालणारी दमदार बॅटरी देखील देण्यात आली आहे. चला या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Molife Sense 320 ची किंमत

ब्लॅक स्ट्राइप Molife Sense 320 स्मार्टवॉचची किंमत भारतात 2,799 रुपयांपासून सुरु होते . त्याच स्मार्टवॉचची प्रीमियम क्वालिटी स्ट्रॅप असलेली लिमीटेड एडीशन वॉच 2,999 रुपयांमध्ये येते. स्मार्टवॉच Molifeworld.com, Amazon आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी ही करता येईल. स्मार्टवॉच 3,499 रुपये आणि 3,699 रुपये किंमतीला खरेदी करता येईल. स्मार्टवॉच ब्लॅक अँड ब्लॅक, गनमेटल ग्रे आणि ब्लॅक आणि रेड स्ट्रॅप्स तसेच लिमिटेड एडिशन व्हर्न रेड स्ट्रॅपसह उपलब्ध असेल.

Molife Sense 320
तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय? 'या' ट्रिक्स वापरुन वाढेल स्पीड

फीचर्स काय आहेत

मोलिफ सेन्स 320 मध्ये 1.7 IPS इन्फिनिटी डिस्प्ले दिला आहे. स्मार्टवॉच झिंक अॅलॉय मेटल केससह येईल, ज्याला एक सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात येईल. कंपनीचा दावा आहे की वॉच वजनाला हलके असेल. या वॉचमध्ये अनेक सेन्सर तसेच ट्रू हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि स्ट्रेस मॉनिटर फीचर्स देण्यात येईल. स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येईल. या स्मार्टवॉचमध्ये 16 स्पोर्ट्स मोड्स तसेच आउटडोअर रनिंग, सायकलिंग, स्किपिंग, डान्सिंग, योगा मोड्स देखील आहेत. स्मार्टवॉचमध्ये 200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टवॉचला 7 दिवसांची बॅटरी लाईफ आणि 15 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळेल.

Molife Sense 320
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 213 किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.