Monsoon Bike Riding: मान्सूनमध्ये लाँग ड्राईव्हला जाताय? मग करा बाईकची 'ही' कामे, प्रवास होईल सुखकर

Monsoon Bike service Care Tips: उन्हाळा संपला असून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात बाइकवर लाँग ड्राईव्हला जाण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी पुढील कामे करून घ्यावे.
Monsoon Bike Riding:
Monsoon Bike Riding: eSakal
Updated on

Monsoon Bike Riding Tips: पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. अनेक लोकांना पावसाळ्यात दुचाकीवर फिरायला आवडते. पण फिरायला जाण्यापुर्वी दुचाकीची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

टायर

मान्सूनमध्ये फिरायला जाण्यापुर्वी टायरची काळजी घ्यावी. कारण बाईक किंवा स्कूटर चालवताना फक्त टायरचा थेट संपर्क रस्त्याशी येतो. जर तुमचे टायर खराब झाले असतील तर ते लगेच बदलावे. टायरमधील ट्रेडचे कार्य पाणी विखुरणे आहे, ज्यामुळे टायर रस्त्यावरील पकड कायम ठेवतो. यासोबत टायरच्या साइडवॉलवर लहान क्रॅक दिसत असतील तर टायर बदलणे चांगले.

टायरमधील हवेचा दाब

बाईक किंवा स्कूटरच्या टायरमध्ये कंपनीने शिफारस केल्याप्रमाणे हवा तेवढीच भरावी. बाईकच्या टायर्समध्ये कमी-जास्त हवा असल्यास त्याचा बाइक किंवा स्कूटरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जर तुमच्या बाईकमध्ये हवा कमी असेल तर त्याचा थेट परिणाम इंजिनवर होतो आणि जर जास्त हवा असेल तर पकड कमकुवत होते.

हेडलाईट,इंडिकेटर आणि बॅटरी चेक करा

तुम्ही तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करून घेता तेव्हा तिचे हेडलाइट, इंडिकेटर आणि बॅटरीकडेही लक्ष द्यावे. जर प्रकाश कमी असेल तर नवीन बल्ब लावा. जर बॅटरी नीट काम करत नसेल, तर ती दुरुस्त करा किंवा बदला. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास या पावसाळ्यात लाँग ड्राईव्हचा आनंद द्विगुणित होईल.

Monsoon Bike Riding:
Car Care : कारमधील एसी फॅनचा वेग वाढवल्यास मायलेज कमी होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर

सर्व्हिसिंग

पावसाळ्यात प्रवासाला जाण्यापुर्वी बाईकची सर्व्हिसिंग करून घ्यावी. कारण बाईकची सर्व्हिसिंग केल्याने बाईकमध्ये येणाऱ्या सर्व किरकोळ समस्या दूर होतात. बाईकची सर्व्हिसिंग करून त्याचे इंजिन ऑइल, एअर फिल्टर, चेनसेट आणि ब्रेक्सच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. दुचाकीचा कुठलाही भाग खराब झाला असेल तर तोही शोधला जातो. जे तुम्ही वेळेत दुरुस्त किंवा बदलू शकता.

हेल्मेट

बाईक चालवताना हेल्मेट नक्की वापरावे. हेल्मेट डोक्याचे चांगले संरक्षण करते आणि अपघात झाल्यास तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहता. त्याचबरोबर पावसाळ्याच्या आगमनापूर्वी हेल्मेटचे व्हिझर नीट तपासा. जर तुमचा व्हिझर तुटला असेल किंवा खूप स्क्रॅच झाला असेल तर ते बदलून घ्या. जर तुम्ही व्हिझरमधून स्पष्टपणे पाहू शकत नसाल, तर पावसात तुमची बाईक चालवताना तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.