Monsoon Bike Tips: पावसाळ्यात बाईक चालवताना खुप काळजी घेणे गरजेचे आहे. तर रात्रीच्या वेळी बाईक चालवणे अधिक अवघड होते. निसरडे रस्ते, पाण्याने भरलेले खड्डे यासारख्या समस्या निर्माण होतात. जर तुम्हालाही पावसाळ्यात रात्री बाईक चालवायची असेल तप पुढील गोष्टी लक्षात ठेवा. ज्यामुळे पावसाळ्यात देखील प्रवास सुखकर होईल.
रात्री पावसाळ्यात बाईक चालवताना नेहमी रेनकोट आणि हेल्मेट वापरावे. यामुळे अपघात होणाऱ्या दुखापतीपासून आणि पावसापासून स्वत:चा बचाव करू शकता. हेल्मेटमध्ये अँटी-फॉग व्हिझर वापरा जेणेकरून तुमची दृष्टी स्पष्ट राहील. सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे हेल्मेट आणि रेनकोट मिळतात.
पावसाळ्यात बाईक चालवताना अचानक ब्रेक लावल्यास घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच अचानक ब्रेक लावू नका. ब्रेक लावण्यापुर्वी बाईकचा वेग कमी करावा. जेणेकरून तुम्ही बाइकवर नियंत्रण ठेवू शकता.
रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असते आणि पावसात बाईक चालवणे अवघड होते. त्यामुळे बाईक चालवण्यापूर्वी लाइटची तपासणी करावी. याशिवाय बाइकचे रिफ्लेक्टर आणि इंडिकेटर नीट काम करत आहेत की नाही याची काळजी घ्यावी.
पावसाळ्यात बाईक चालवताना वेग कायम कमी ठेवावा. कारण पावसात रस्ते निसरडे होतात, त्यामुळे बाईकवर नियंत्रण राहत नाही. अशावेळी बाईखचा वेग कमी ठेवल्यास ब्रेक लावल्यास घसरत नाही. तसेच अपघात होणार नाही.
पावसाळ्यात बाईक चालवताना समोरील वाहनापासून अंतर ठेवावे. समोरच्या व्यक्तीने अचानक ब्रेक लावल्यास अपघात होऊ शकता. यामुळे पावसाळ्यात बाईक चालवताना वाहनांपासून अंतर ठेवावे.
पावसात बाईक चालवताना योग्य मार्ग निवडावा. यासाठी गुगल मॅपची मदत घेऊ शकता. तसेच समोरच्या येणाऱ्या वाहनांच्या इंडिकेटरकडेही लक्ष द्यावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.