Monsoon Car Tips : आला पावसाळा, गाड्या सांभाळा! अपघात टाळण्यासाठी तपासून घ्या टायर; पाहा कसं

तुमचा टायर बदलण्याची गरज आहे की नाही हे तुम्ही घरीच तपासू शकता.
Monsoon Car Tips
Monsoon Car TipseSakal
Updated on

मान्सूनच्या आगमनाने सर्व जण सुखावले आहेत. पहिल्या पावसाची चाहूल लागताच, ट्रेकिंग किंवा निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी बाहेर पडण्याची बऱ्याच जणांना इच्छा होते. मात्र, पावसाळ्यात निसरड्या रस्त्यांमुळे अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे, तुम्हीदेखील पावसात राईडला जाणार असाल, तर गाडीचे टायर तपासून घेणं गरजेचं आहे.

तुमचा टायर बदलण्याची गरज आहे की नाही हे तुम्ही घरीच तपासू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. यामुळे तुम्ही वेळीच योग्य निर्णय घेऊन पुढचा धोका टाळू शकता.

Monsoon Car Tips
Monsoon Update : मान्सून आला रे…! पुढील पाच दिवस छत्रीशिवाय बाहेर पडू नका

टायरमधील खाचा

तुम्ही पाहिलं असेल, की टायरवर वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन बनवण्यात आलेलं असतं. हे डिझाईन टायरला आकर्षक बनवण्यासाठी नसतं. तर, टायरला रस्त्यावर चांगली ग्रिप मिळावी यासाठी तयार केलेल्या खाचा असतात.

तुम्ही जेवढा जास्त टायर वापराल, तेवढ्या त्या खाचा गायब होतात. जर तुमच्या टायरवर अशा खाचा दिसत नसतील, आणि संपूर्ण चाक गुळगुळीत दिसत असेल; तर तुम्हाला त्वरीत तो बदलून घेण्याची गरज आहे. कारण असे टायर घसरण्याचा धोका अधिक असतो.

Monsoon Car Tips
Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करायचं टेन्शन येतं? ट्राय करा या टिप्स

टायरचं वय तपासा

टायर कितीही चांगला असला, तरी एका कालावधीनंतर त्याचा वापर करणं टाळावं. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असतेच. तुमच्या टायरची एक्सपायरी डेट देखील टायरवरच दिलेली असते. ती पाहून तुम्ही टायर आणखी किती वापरता येईल याचा निर्णय घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला टायरवर लिहिलेले आकडे पाहावे लागतील. जर त्या टायरवर ०३२३ असं लिहिलं असेल, तर याचा अर्थ आहे की तो टायर २०२३ च्या तिसऱ्या महिन्यात बनवण्यात आला आहे.

स्पीड कमी ठेवा

ओल्या रस्त्यावर गाडी चालवताना खबरदारी म्हणून गाडीचा वेग कमीच ठेवणे उत्तम. यामुळे अचानक ब्रेक दाबण्याची गरज कमी होते, आणि गाडी घसरण्याचा धोकाही कमी होतो.

Monsoon Car Tips
Bike Safety Tips : पावसाळ्यात तुमच्या लाडक्या बाईकची काळजी कशी घ्याल?

सुरक्षित अंतर राखा

पावसाळ्यात गाडी चालवताना समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. समोरची गाडी पटकन थांबली, तर तुम्हाला ब्रेक दाबण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, आणि घसरून पडण्याचा किंवा टक्कर होण्याचा धोका टळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.