Power Generator : पावसाळ्यात वारंवार जातेय लाईट? हा छोटू जनरेटर करेल मोठं काम! फोन-लॅपटॉप अन् टीव्हीही चालेल

पावसाळा सुरू झाला की एक तक्रार कायम दिसून येते - ती म्हणजे वीज जाण्याची.
Power Generator
Power GeneratoreSakal
Updated on

पावसाळा सुरू झाला की एक तक्रार कायम दिसून येते - ती म्हणजे वीज जाण्याची. आपल्याकडे कित्येक ठिकाणी थोडासा पाऊस जरी आला, तरी बराच वेळ वीज गायब केली जाते. अशा वेळी जर फोन किंवा लॅपटॉप चार्ज नसतील, तर आणखी वैताग येतो.

जनरेटर हा यावर चांगला पर्याय आहे. मात्र याची किंमतही जास्त असते, आणि त्याला ठेवण्यासाठी भरपूर जागाही लागते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज एका अशा जनरेटरबद्दल माहिती देणार आहोत, जो अगदी छोटासा आहे. मात्र, याची तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.

Power Generator
Monsoon Car Tips : आला पावसाळा, गाड्या सांभाळा! अपघात टाळण्यासाठी तपासून घ्या टायर; पाहा कसं

कोणता आहे जनरेटर

आम्ही ज्या जनरेटरबद्दल सांगत आहोत, त्याचं नाव SARRVAD Portable Solar Power Generator S-150 असं आहे. आकाराने छोटा असल्यामुळे हा जनरेटर अगदी छोट्या जागेतही मावतो. तसंच हा उचलून दुसरीकडे नेण्यासाठी देखील सोपा आहे.

Power Generator
Electricity Bill : घरमालक जास्त लाईट बिल घेतोय? सब-मीटरमध्ये असू शकतो झोल; लगेच करा चेक!

क्षमता आणि किंमत

या जनरेटरची क्षमता 42000mAh 155Wh एवढी आहे. याचं वजन अवघं 1.89 किलो आहे. विशेष म्हणजे हा जनरेटर तुम्ही सोलर पॅनलच्या मदतीने चार्ज करू शकता. या जनरेटरची किंमतही अवघी 19 हजार रुपये आहे. जर इन्व्हर्टरशी तुलना केली, तर ही किंमत अगदीच वाजवी आहे.

काय-काय होईल चार्ज?

तुम्ही या जनरेटच्या मदतीने लॅपटॉप, रेडिओ, पॉवरबँक, मोबाईल अशा गोष्टी आरामात चार्ज करू शकता. याच्या मदतीने तुम्ही एक आयफोन सुमारे दहा ते १२ वेळा चार्ज करू शकता.

Power Generator
Electric Scooter : अचानक संपली स्कूटरची चार्जिंग, अन् घर आहे दूर? जाणून घ्या अशा वेळी काय कराल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.