Monsoon Tips for Bike : पेट्रोलच्या टाकीत गेलंय पाणी? लगेच करा 'हे' काम', नाहीतर होईल मोठं नुकसान

पेट्रोलच्या टाकीचे झाकण वरतीच असणाऱ्या सर्व बाईक्सना याचा धोका राहतोच.
Monsoon Tips for Bike
Monsoon Tips for BikeeSakal
Updated on

पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या पेट्रोल टँकमध्ये पाणी जाण्याची शक्यता भरपूर वाढते. ज्या स्कुटींचे पेट्रोल टँक ड्रायव्हर सीटखाली असतात, त्यांमध्ये ही शक्यता कमी असते. मात्र, पेट्रोलच्या टाकीचे झाकण वरतीच असणाऱ्या सर्व बाईक्सना याचा धोका राहतोच.

पेट्रोल टाकण्याच्या झाकणामधून थोडं जरी पाणी आत गेलं, तरी ते गाडीसाठी भरपूर नुकसानदायक असतं. कारण पेट्रोल आणि पाणी हे कधीही एकमेकात मिसळत नाहीत. अशा वेळी, पेट्रोलच्या टाकीत पाणी गेलं, तर गाडी एकतर सुरूच होत नाही. किंवा मग सुरू झाली तरी इंजिनमध्ये पाणी जाऊन तुम्हाला हजारो रुपयांना भुर्दंड बसू शकतो.

Monsoon Tips for Bike
Car Tips : सिमेंटच्या रस्त्यावरील अपघात वाढले; गाडीचा टायर फुटू नये यासाठी कशी घ्याल खबरदारी? जाणून घ्या

जर तुमच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पाणी गेलं असेल, तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते काढू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गाडीच्या पेट्रोल टँकमधील पेट्रोल काढून घ्यावं लागेल. यासाठी तुम्ही एक छोटा पाईप आणि प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीची मदत घेऊ शकता. या पद्धतीने पेट्रोलची टाकी पूर्ण रिकामी करून घ्या.

Monsoon Tips for Bike
Bike Riding Tips : पावसाळ्यात दुचाकी चालवताना काय घ्यावी खबरदारी? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

यानंतर पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडून गाडी उन्हात ठेवा. यामुळे टाकीमध्ये पेट्रोलचे राहिलेले थेंब हे उडून जातील. तसंच, आतील पाण्याच्या थेंबांचं देखील बाष्पीभवन होईल. यानंतर तुमच्या बाईकच्या टाकीमध्ये पाणी किंवा पेट्रोल यांपैकी काहीही उरणार नाही, आणि ती एकदम कोरडी होईल.

आता मगाशी बाटलीमध्ये जे पेट्रोल काढलं होतं त्याकडे लक्ष द्या. ही बाटली एका ठिकाणी स्थिर ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर या पेट्रोलमधील पाणी पेट्रोलच्या वर तरंगताना दिसेल. बाटली उघडून अलगदपणे हे वर आलेलं पाणी फेकून द्या. यामुळे बाटलीमध्ये फक्त पेट्रोल शिल्लक राहील. हे पेट्रोल तुम्ही गाडीच्या टँकमध्ये टाकू शकता.

Monsoon Tips for Bike
Bike Safety Tips : पावसाळ्यात तुमच्या लाडक्या बाईकची काळजी कशी घ्याल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()