Moon Cave Discovery : जिथं नील आर्मस्ट्राँग आणि बझ अल्ड्रिन यांनी 55 वर्षांपूर्वी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते, त्याच्या जवळच चंद्रावर मोठी गुहा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. या गुहा भविष्यातील अंतराळवीरांसाठी आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
इटलीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या संशोधनानुसार, चंद्रावरील सर्वात खोल मोठ्या खड्ड्याशी जोडणारी ही गुहा असावी, असे संकेत मिळाले आहेत. ही गुहा "ट्रान्क्वीलिटी समुद्र" (Sea of Tranquility) मध्ये असून, ती अपोलो 11 च्या अवतरणस्थळापासून जेमतेम 250 मैल (400 किलोमीटर) अंतरावर आहे. चंद्रावर आढळलेल्या 200 पेक्षा जास्त अशा खड्ड्यांची निर्मिती लावाच्या प्रवाहामुळे झालेल्या खळग्यांच्या कोसळण्याने झाली असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
NASA च्या "लुनर रिकोनिसन्स ऑर्बिटर" या यानाने पाठवलेल्या राडार मोजमानांची पृथ्वीवरील लावा प्रवाहांच्या नलिका (Lava tubes) शी तुलना करून हे संशोधन करण्यात आले असून, त्याचे निष्कर्ष "नेचर अस्ट्रोनॉमी" या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.
चंद्रावर पाठवलेल्या अनेक उपग्रहां व्हावे आजपर्यंत चंद्रावरील पाण्याचे साठे जमीन आणि अनेक गोष्टींचा शोध लागला आहे त्यांच्या अस्तित्वाची अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत अशात चंद्रावर गुहा सापडणे किंवा त्याचे अस्तित्व सापडणे हे खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे
संशोधकांनी ही महत्वपूर्ण माहिती जगाला देताना म्हणाले की ही भविष्यात चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी खरंच खूप उपयोगाची ठरणार आहे. त्यांना तिथं राहण्यास, आश्रय घेण्यास ही गुफा फार उपयुक्त ठरेल. जगभरात चंद्रावर असलेल्या या गुहेची चर्चा होत आहे प्रत्येकजण याच्याकडे कुतुहलाने पाहत आहे.
अद्याप याबाबतची जास्त माहिती संशोधकांनी जगासमोर आणली नसली तरी भविष्यात याबद्दलची अधिक माहिती उपग्रह जगापर्यंत पोहोचवेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी या चंद्रावरील गुहेबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चंद्रावर गुहा सापडणं ही खरंच कुतूहलाची बाब आहे कारण आजपर्यंत आपण फक्त जमिनीवरील,डोंगरदऱ्या आणि जंगलातील गुहेबद्दल ऐकलं होतं किंवा पाहिलेलं होतं पण आता चंद्रावरची गुहा नेमकी आहे तरी कशी, भविष्यात मानव वस्तीसाठी उपयोगी ठरेल का याबाबत जागतिक स्तरावर चर्चा रंगल्या आहेत. सामान्य माणसाला तर या चंद्रावरच्या गुहेबद्दल विशेष आकर्षण वाटणं साहजिक आहे तर या गुहेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये कुतूहलाची भावना निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.