Chandrayaan-3 : लुना-2, अपोलो ते चांद्रयान; या आहेत जगातील 10 मोठ्या चंद्र मोहिमा

Moon Missions News: या मोहिमांमुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात मानवाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.
Moon Missions News
Moon Missions NewseSakal
Updated on

Moon Missions: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता चंद्रयान-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्यास हे चांद्रयान नवा इतिहास घडवणार आहे.

ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत या यादीत अमेरिका, रशिया, चीन यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया आतापर्यंतच्या जगातील 10 सर्वात मोठ्या चंद्र मोहिमांबद्दल, ज्या अंतराळ संशोधनाचे एक प्रमुख माध्यम बनल्या.

Moon Missions News
Chandrayan-3 : चांद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी घेणाऱ्या रितू करिधल कोण आहेत?

लुना 2

1959 मध्ये प्रक्षेपित केलेला लुना-2 हा चंद्राच्या कक्षेत जाणारा पहिला कृत्रिम उपग्रह होता. या मोहिमेद्वारेच चंद्राच्या पृष्ठभागाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आणि येथे कोणतेही चुंबकीय क्षेत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

लुना 3

सोव्हिएत युनियनने 1959 मध्ये हा उपग्रह प्रक्षेपित केला. चंद्राची अनेक छायाचित्रे घेतलेल्या लुना 2 च्या यशानंतर, या मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर मोठे खड्डे असल्याचं उघड केलं.

सर्वेअर प्रोग्राम

1966 आणि 1968 दरम्यान, नासाने चंद्रावर एक सर्वेअर प्रोग्राम चालवला. ज्यामध्ये सात मानवरहित विमाने पाठवली गेली. या सर्वांनी चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट-लँड केले आणि चंद्राच्या मातीच्या यांत्रिकी आणि थर्मल वैशिष्ट्यांवरील डेटा गोळा केला.

Moon Missions News
Chandrayaan-3 : कशा प्रकारे होणार चांद्रयान लाँच? इस्रोने केली रंगीत तालीम; जाणून घ्या दहा टप्पे

अपोलो 8

1968 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले हे मिशन फ्रँक बोरमन, जेम्स लोवेल आणि विल्यम अँडर्स यांच्यासह चंद्राभोवती फिरणारे पहिले मानवयुक्त अंतराळयान होते. या मिशनने भविष्यातील मोहिमांचा पाया घातला.

Moon Missions News
चांद्रयान-३ : काय आहे मिशन? कधी होणार लाँच? जाणून घ्या

अपोलो 11

1969 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली, ही एक अमेरिकन अंतराळ मोहीम होती. यातून मानव पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचला. यात अंतराळवीर होते नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन.

अपोलो 13

1970 मध्ये ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. परंतु हे मिशन अयशस्वी झाले. वास्तविक, चंद्राकडे जात असताना वाहनातील ऑक्सिजन टाकीत स्फोट झाला. यामुळे नासाने मध्येच ते अबॉर्ट केले होते.

Moon Missions News
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

अपोलो 15

नासाची ही मोहीम खूप खास होती. 1971 मध्ये सुरू केलेल्या या मोहिमेद्वारेच नासाने चंद्रावर आपले लुनार रोव्हर उतरवले, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाविषयी वैज्ञानिक माहिती गोळा करण्यात मदत झाली.

अपोलो 17

नासाने 1972 मध्ये प्रक्षेपित केलेले हे मिशन अपोलो प्रोग्राममधील शेवटचे मिशन होते. चंद्रावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम होती, ज्यातून चंद्राचे नमुने गोळा करण्यात आले होते.

Moon Missions News
Chandrayaan-3 : इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतले तिरुपती वेंकटचलपतिचे दर्शन; चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी केली पूजा

चांगई 4

चीनने 2019 मध्ये हा उपग्रह लाँच केला, जो यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेने चंद्राचा भूगर्भ आणि संरचनेबद्दल बरीच माहिती दिली.

चांद्रयान-2

भारताने 2019 मध्ये चांद्रयान-2 लाँच केले. त्यात ऑर्बिटर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश होता. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. मात्र, लँडिंगपूर्वी लँडरमध्ये बिघाड झाल्याने लँडिंग करणे कठीण झाले. आता भारत चांद्रयान-3 द्वारे पुन्हा एकदा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार आहे. (ISRO Moon Mission)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.