Cyber Attacks : देशात आठवड्याला एका कंपनीवर होतात २,००० सायबर हल्ले; जगभरातील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ

चेक पॉइंट नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीने हा अहवाल सादर केला आहे.
Cyber Attacks
Cyber AttackseSakal
Updated on

भारतात सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक माहिती एका सॉफ्टवेअर कंपनीने दिली आहे. चेक पॉईंट नावाची ही अमेरिकन-इस्रायली कंपनी आहे. जगभरातील कंपन्यांवर होणारे सायबर हल्ले याबाबत त्यांनी अहवाल सादर केला आहे.

ही एक गंभीर स्थिती असून, जगभरातील कंपन्यांनी तातडीने आपली सायबर सिक्युरिटी आणखी मजबूत करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलंय. (Cyber Crime)

Cyber Attacks
Call Center Scam : पालघरमध्ये बसून कॅनडातील नागरिकांना घालायचे गंडा; बनावट कॉल सेंटर चालवणारी गँग ताब्यात

जगभरातील सायबर हल्ल्यात वाढ

२०२३ च्या उत्तरार्धात जगभरातील सायबर हल्ल्यांमध्ये दर आठवड्याला आठ टक्क्यांची वाढ दिसून आली. जगभरात सरासरी एका कंपनीवर आठवड्याभरात १,२३९ सायबर हल्ले झाले. यामुळे असे हल्ले हे 'न्यू नॉर्मल' होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

भारतावर परिणाम

गेल्या सहा महिन्यांमध्ये, दर आठवड्याला एका भारतीय कंपनीवर तब्बल २,१४६ सायबर हल्ले झाल्याची नोंद झाली. ही सरासरी जगभरातील सायबर हल्ल्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. यामध्ये हेल्थकेअर, एज्युकेशन, रिसर्च, सरकारी आणि लष्करी तसेच इन्शुरन्स आणि लीगल कंपन्यांचा सर्वाधिक समावेश होता.

Cyber Attacks
Nashik Cyber Crime: घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष पडले महागात; महिलेला 15 लाखांना घातला गंडा

आशिया-पॅसिफिक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के अधिक सायबर हल्ले झाल्याचं या रिसर्चमध्ये दिसून आलं. जगभरात सर्वाधिक सायबर हल्ले हे शिक्षण आणि रिसर्च क्षेत्रातील कंपन्यांवर झाले असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

एआयचा वापर

सायबर हल्ल्यांसाठी हॅकर्स एआय तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात प्रमुख्याने चॅटजीपीटी४ आणि इतर जनरेटिव्ह एआयचा वापर करण्यात येत आहे.

Cyber Attacks
Cyber Crime : सायबर चोरट्यांच्या मायाजालापासून सावधान! तक्रारींचे प्रमाण वाढतेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()