AI Danger : एआयच्या मदतीने महिलांचे निर्वस्त्र फोटो तयार करणाऱ्या अ‍ॅप्सना 'इतके' लोक देतात भेट; धक्कादायक रिपोर्ट समोर

अशी सेवा पुरवणाऱ्या लिंक्समध्ये तब्बल 2400 टक्के वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
AI Clothes Removing Tool
AI Clothes Removing TooleSakal
Updated on

AI Clothes Removing Tool : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि त्याच्या धोक्यांबाबत सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. डीपफेकच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्याचा प्रकार वाढत असतानाच, एका रिपोर्टने धक्कादायक वास्तव समोर मांडलं आहे. एआयच्या मदतीने फोटोमधील व्यक्तीचे कपडे हटवणाऱ्या वेबसाईट्स किंवा अ‍ॅप्सना जगभरातील 2.4 कोटी लोक भेट देतात असं स्पष्ट झालं आहे.

ग्राफिका नावाच्या एका सोशल नेटवर्क अ‍ॅनालिसिस करणाऱ्या कंपनीने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने फोटोतील व्यक्तीचे कपडे हटवणाऱ्या अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सना एकट्या सप्टेंबर महिन्यातच 24 मिलियन लोकांनी भेट दिली. यामध्ये न्यूडीफाय नावाच्या वेबसाईटची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात मदत घेतल्याचंही स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियावर फोटो होतात शेअर

या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक्स किंवा रेडिट अशा सोशल मीडिया साईट्सवर फोटो किंवा व्हिडिओमधून कपडे रिमूव्ह करुन देणाऱ्या लिंक्सच्या जाहिराती वाढल्या आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप्स किंवा वेबसाईट्स या केवळ महिलांचे फोटो एडिट करुन देतात. यासाठी सोशल मीडियावरुन महिलांचे फोटो चोरून, त्यांना अनड्रेस करुन ते फोटो शेअर केले जातात. अशी सेवा पुरवणाऱ्या लिंक्समध्ये तब्बल 2400 टक्के वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

AI Clothes Removing Tool
Deepfake Video : 'डीपफेक'च्या धोक्यापासून असा करा स्वतःचा बचाव; कामी येतील 'या' टिप्स!

शाळकरी मुलं आहेत यूजर्स

अशा अ‍ॅप्स किंवा व्हिडिओंच्या माध्यमातून डीपफेक पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या वेबसाईट्सच्या वापरकर्त्यांमध्ये शाळकरी किंवा कॉलेजच्या मुलांचा समावेश अधिक असल्याचं देखील या रिसर्चमध्ये समोर आलं आहे. (Tech News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.