OnePlus ने Nord ब्रँडिंग अंतर्गत भारतात एक नवीन ऑडिओ प्रॉडक्ट लाँच केला आहे. कंपनीने 3.5mm जॅकसह OnePlus Nord वायर्ड इयरफोन लॉन्च केला आहे. हे कंपनीचे पहिले वायर्ड इयरफोन आहेत. वास्तविक, OnePlus Nord वायर्ड इयरफोनची किंमत लीक झालेल्या किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. OnePlus च्या फक्त OnePlus Nord CE, OnePlus Nord CE 2 आणि OnePlus Nord CE 2 Lite डिव्हाइसेसमध्ये हेडफोन जॅकची सुविधा दिली आहे. तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या त्याची किंमत आणि फीचर्स...
OnePlus Nord वायर्ड इअरफोन्समध्ये काय खास आहे?
OnePlus Nord वायर्ड इअरफोन्स 110±2dB ड्रायव्हर सेंसिटीव्हीटी 32±10% इम्पीडेंस आणि 102dB ध्वनी प्रेशरसह 9.2mm ड्राइव्हर सेटअप देण्यात येतात. हे इयरफोन इन-इअर स्टाईल डिझाइन आणि एंगल डिझाइनसह येतात जे कंफर्टेबल फिट देतात. यामध्ये तुम्हाला तीन सिलिकॉन इअरटिप्स (S, M, L) पर्याय मिळतात.
कंट्रोल्ससाठी, यात इन-लाइन कंट्रोल बटण आहे ज्यामध्ये व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाउन आणि मल्टी-फंक्शन बटण देण्यात आले आहे जे डबल प्रेस, ट्रिपल प्रेस, प्रेस आणि होल्ड ऑपरेशन करू शकते. शिवाय, घाम आणि पाण्याच्या संरक्षणासाठी इयरफोन IPX4 रेट केलेले आहेत. तसेच, बुलेट्स वायरलेस झेड बीटी इयरफोन्स प्रमाणे, हे नवीन नॉर्ड वायर्ड इयरफोन देखील मॅग्नेटसह येतात जे म्युजीक प्ले/पॉज करण्यासाठी एकत्र चिकटतात. हे वापरासाठी अत्यंत सोयीस्कर आहेत.
OnePlus Nord वायर्ड इअरफोन्सची किंमत
OnePlus Nord वायर्ड इयरफोनची किंमत 799 रुपये इतकी आहे आणि हे ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो. OnePlus, Amazon आणि OnePlus ऑफलाइन स्टोअर्सच्या अधिकृत साइटवर 1 सप्टेंबरपासून इयरफोन्स उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.