Car Theft : चोरांची फेव्हरेट आहे 'ही' गाडी.. यावर्षी सर्वाधिक चोरी झालेल्या कार्सच्या यादीत मिळवलं पहिलं स्थान!

Vehicle Theft Report : 2023 व्हीकल थेफ्ट रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. देशात वाहन चोरीच्या प्रकरणांपैकी 37 टक्के प्रकरणं ही दिल्लीमध्ये नोंदवली गेली आहेत.
Car Theft Record
Car Theft RecordeSakal
Updated on

Most Stolen Car in India : देशातील वाहन चोरी घटनांमध्ये 2023 या वर्षात मोठी वाढ दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कार चोरीचं प्रमाण दुप्पट तर बाईक चोरी होण्याचं प्रमाण तब्बल नऊ पट वाढलं आहे. देशात सर्वाधिक गाड्या या राजधानी दिल्लीमध्ये चोरी झाल्या आहेत हे विशेष!

2023 व्हीकल थेफ्ट रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. देशात वाहन चोरीच्या प्रकरणांपैकी 37 टक्के प्रकरणं ही दिल्लीमध्ये नोंदवली गेली आहेत. दिल्लीमध्ये दर 12 मिनिटाला एक वाहन चोरी होतं. सर्वाधिक चोरीच्या घटना उत्तम नगर, भजनपुरा, शाहदरा, बदरपूर आणि पटपडगंज या भागांमध्ये होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीनंतर बंगळुरूमध्ये 9% आणि चेन्नईमध्ये 5% गाड्यांची चोरी नोंदवली गेली. यानंतर या यादीमध्ये हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये एका वर्षाला सुमारे 3 लाख वाहन चोरीची नोंद होते. या रिपोर्टमध्ये असंही स्पष्ट झालं की पांढऱ्या रंगांच्या गाड्यांची सर्वाधिक चोरी झाली होती.

Car Theft Record
Elon Musk Car Thief : इलॉन मस्कने चोरी केली होती कार, पोस्टमध्ये स्वतःच दिली कबूली; नेमकं काय घडलं?

चोरांची फेव्हरेट गाडी

या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे, की 2023 मध्ये वॅगनआर (WagonR) ही गाडी सर्वाधिक चोरी झाली. एकूणच चोरांची ही फेव्हरेट गाडी ठरली. यानंतर या यादीमध्ये ह्युंडाई ग्रँड i10, सँट्रो, क्रेटा (Creta) आणि होंडा सिटी (Honda City) या गाड्यांचा समावेश होतो.

चोरांची फेव्हरेट बाईक

दुचाकी गाड्यांमध्ये होंडाच्या स्प्लेंडर (Splender) गाडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होंडा एक्टिव्हा, टीव्हीएस अपाचे आणि रॉयल एनफील्ड क्लासिक 350 या गाड्यांचा समावेश या यादीत होतो. यासोबतच हीरो सीडी डिलक्स, हीरो HF डिलक्स आणि हीरो स्प्लेंडर प्लस या गाड्याही मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

Car Theft Record
Types of Cars : SUV, XUV, TUV आणि MUV यामध्ये काय असतो फरक? नवी कार घेण्यापूर्वी नक्की जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.