नवी दिल्ली : मोटोरोला (Motorola)ने आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी 9 पॉवर भारतात लाँच केला आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत आहे फक्त 11,999 रुपये. मोबाईलचा सेल 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. मोटो जी 9 पॉवरमध्ये 6000 एमएएच बॅटरीसह अधिक खास वैशिष्ट्ये आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया.
मोटो जी 9 पॉवरची वैशिष्ट्ये -
या मोबाईलमध्ये 720x1640 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.8 इंच एचडी आणि आयपीएस डिस्प्ले आहे. 20.5 : 9 च्या आस्पेक्ट रेशोसह हा मोबाईल येतो. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 एसओसी चीपसेट देण्यात आली आहे. तसेच ड्युअल नॅनो सिमची फॅसिलिटी देणारा हा मोबाईल अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमनुसार कार्य करतो.
कॅमेरा
फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमध्ये तीन कॅमेरे मागील बाजूला दिले आहेत. यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरासोबत 2 मेगापिक्सलचा माइक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीप्रेमींसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या मोबाईलमध्ये 6000mAh बॅटरी असून मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध करून दिला आहे. तसेच बॅटरी चार्ज करण्यासाठी 20W चा वेगवान चार्जर मोबाईलसोबतच मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसारखे पर्याय मिळत आहेत.
- साय-टेकसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.